शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकली; गोव्यातील बड्या नेत्याचा मोठा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 09:39 IST

Goa Election 2022: काँग्रेसने बाणावली मतदारसंघाची उमेदवारी विकली, असा आरोप करत या नेत्याने सर्व खापर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर फोडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मडगाव :काँग्रेसने बाणावली मतदारसंघाची उमेदवारी विकली, असा आरोप माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी केला आहे. त्यांनी सर्व खापर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर फोडले आहे. पाशेको हे स्वत: या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवर इच्छुक होते. 

बाणावली गट काँग्रेस समितीने उमेदवारीसाठी पाच नावे पाठवून दिली होती. त्यात मिकी यांच्या नावाचाही समावेश होता. बाणावलीत काँग्रेसने अँथनी डायस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २४ तासांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, उमेदवारीसाठी इच्छुकांनी आता आपली नापसंती जाहीरपणे उघड करण्यास सुरुवात केली आहे. पाशेको यांनी तर शनिवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्याचा राजीनामाही दिला.

एका खासगी दूरचित्रवाणीशी बोलताना पाशेको यांनी आपल्या मनाची खंत बोलून दाखविली. अर्थात त्यामागे तिकीट डावलल्याचे प्रमुख कारण होते. मिकी यांनी यासाठी दिगंबर कामत यांना दोषी ठरविले.  ‘मी तीनदा बाणावलीचा आमदार होतो, तर एकवेळ नुवे मतदार संघातून विजयी झालो होतो. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मी या पक्षाच्या कार्यक्रमात लोकांना आणले होते. 

स्वत: कामत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मी त्यांच्या सरकारात मंत्रीपदी असताना नादिया प्रकरणात त्यांनी मला राजीनामा देण्यास भाग पाडले होते’ असे पाशेको म्हणाले. दरम्यान, ‘डायस यांना उमेदवारी देण्यात फिश फॉर्मेलिन माफिया इब्राहीम मुल्ला यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुल्ला व आमदार विजय सरदेसाई हे पार्टनर आहेत,’ असे पाशेको म्हणाले. २०१७ साली बहुमत मिळूनही काँग्रेसची जी स्थिती झाली, तशीच यावेळीही होणार असेही पाशेकाे म्हणाले.

२४ तासांआधी पक्षप्रवेश, मग तिकीट कसे दिले? : पेरेरा

चोवीस तासांपूर्वी पक्षात प्रवेश केल्यानंतर अँथनी डायस यांना लगेच उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीच्या सरचिटणीस जीना पेरेरा यांनीही, काँग्रेसने उमेदवारी विकल्याचा आरोप केला आहे. बाणावली मतदारसंघातील या उमेदवारीनंतर पक्षातील असंतोषाला वाचा फुटली आहे.  ‘काँग्रेसची उमेदवारी ३० लाख रुपयांना विकली जाणार अशा वावड्या आधी उठल्या होत्या. मात्र आता ते सत्य असल्याचे दिसत आहे,’ असे सरचिटणीस जीना परेरा म्हणाल्या. डायस यांना उमेदवारी दिल्याबाबत परेरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या स्वत: बाणावलीतून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. 

गट काँग्रेस समितीतर्फे पाच नावाची शिफारस केली होती. डायस हे तृणमूलमध्ये होते. पक्षाची उमेदवारी जाहीर होण्याच्या २४ तास आधी त्यांनी काँग्रेसप्रवेश केला. ते प्रवेश करतात काय आणि त्यांना उमेदवारी जाहीरही केली जाते हे गौडबंगालच होय’ असे त्या म्हणाल्या. ‘पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा हा प्रकार आहे असे त्यांनी सांगितले. डायस यांना उमेदवारी जाहीर करताना पक्षाने दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीलाही अंधारात ठेवले, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस