शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

Goa Election 2022 : पंडित नेहरुंनी गोवा मुक्तिसाठी सैन्य पाठवण्यास नकार दिला होता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 20:40 IST

काँग्रेसने नेहमीच गोमंतकीयांचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर केला : पंतप्रधान

पणजी : "काँग्रेसला गोव्याची कधीही चिंता नव्हती. पंडित नेहरुंनी गोवा मुक्तिसाठी सैन्य पाठवण्यास नकार दिला होता. काँग्रेसने नेहमीच गोमंतकीयांचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर केला," अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हापसा येथील जाहीर सभेत केली. "गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी येथे सत्याग्रही, स्वातंत्र्यसैनिक गोळ्या झेलत होते, पोर्तुगीजांचे अत्याचार सहन करत होते. मात्र त्यावेळी काँग्रेस सरकारने गोव्याला मदत केली नाही. लाल किल्ल्यावर भाषण करताना गोवा मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवणार नाही, असे जाहीरपणे सांगितले," असेही मोदी यावेळी म्हणाले.

निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान गुरुवारी गोव्यात दाखल झाले होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर नेते तसेच पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.सांगितला 'गोवा'चा अर्थ"गोवा म्हणजे ‘जी फॉर गव्हर्नन्स, ओ फॉर ओपोर्च्युनिटी व ए फॉर अ‍ॅस्पिरेशन’ असे आम्ही मानतो. गोव्यातने गव्हर्नन्स अर्थात प्रशासनाच्या बाबतीत देशात आदर्श राज्य बनण्याचा मान मिळवला आहे," असे मोदींनी नमूद केले.

'लाँचिंग पॅड म्हणून पाहतायत'काही राजकीय पक्ष गोव्याला लाँचिंग पॅड म्हणून पहात आहेत. या पक्षांना गोव्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यांच्याकडे कोणतीही दूरदृष्टी किंवा अजेंडा नाही. या राजकीय पक्षांबद्दल गोमंतकीयांना आता बरेच काही कळून चुकले आहे. गोमंतकीयांची निवड शुद्ध आहे आणि गोवेकर भाजपच्याच पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

'भाजप कटिबद्ध'"गोव्याच्या या भूमीत एकदा मी आलो असता अनपेक्षितपणे माझ्या मुखातून काँग्रेसमुक्त भारत असे उद्गार आले. आज संपूर्ण देशात अनेक नागरिक ‘काँग्रेसमुक्त भारत’चा ठराव घेत आहेत. लोकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. डबल इंजिन सरकार नसते तर १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गोव्यात सफल झाले असते का? गोव्याचा पर्यटन व्यवसाय आज शंभर टक्के लसीकरणामुळेच बहरला आहे हे विसरुन चालणार नाही," असे मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Narendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूPramod Sawantप्रमोद सावंत