शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आमदारांची संख्या वाढली, ११ आमदारांवर विविध गुन्हे; भाजपचे ५

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 08:24 IST

डेमोक्रेटिक रिफॉर्म असोसिएशनचा अहवाल

पूजा नाईक-प्रभुगावकर पणजी : आपला आमदार हा स्वच्छ पार्श्वभूमीचा, चांगल्या चारित्र्याचा असावा, असे मतदारांना वाटते. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २००७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विविध गुन्हे नोंद असलेले ९ आमदार निवडून आले होते. तर गेल्यावेळी, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत हा आकडा ११ वर पोहोचला आहे. मावळत्या विधासभेत विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले ११ आमदार कार्यरत होते. 

असोसिएशन ऑन डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या  स्वयंसेवी संस्थेने यासंबंधीचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार राज्यात २००७ साली निवडून आलेल्या ४० पैकी ९ आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद होते. यात अपहरण, बलात्कार, खुनाचा प्रयत्न करणे, लैंगिक अत्याचार तसेच अन्य अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी या आमदारांवर विविध पोलीस स्थानकांत गुन्हे नोंद आहेत.

दहा वर्षांपूर्वी, २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली. ९ वरून हा आकडा १२ वर पोहोचला. या १२ आमदारांपैकी २ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. अजूनही काही प्रकरणांमधील त्यांच्यावरील खटले निकाली काढण्यात आलेले नाहीत.

गेल्यावेळी, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या ४० पैकी ११ आमदारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. या ११ पैकी ९ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यापैकी बहुतेक जण हे यंदा, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावणार आहेत. ९ आमदारांमध्ये भाजपचे पाच, काँग्रेसचे दोन तर गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश असल्याचे एडीआरच्या अहवालात नमूद आहे.

आमदारांवर विविध गुन्हे नोंदअपहरण, बलात्कार, खुनाचा प्रयत्न करणे, लैंगिक अत्याचार तसेच अन्य अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश 

पक्षनिहाय आमदारांवर गंभीर गुन्हे ५ भाजप, २ काँग्रेस, १ गोवा फॉरवर्ड, १ राष्ट्रवादी काँग्रेस

२००७ विधानसभा निवडणूक - ९ गुन्हे नोंद असलेले आमदार २०१२ विधानसभा निवडणूक - १२ गुन्हे नोंद असलेले आमदार २०१७ विधानसभा निवडणूक - ११ गुन्हे नोंद असलेले आमदार 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेस