शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: “भाजपने दुसऱ्या पक्षातून उमेदवार विकत घेतले, ५ वर्षांत गोव्याची दुर्दशा केली”: नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:27 IST

Goa Election 2022: योग्य पर्यटन धोरण, व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भाजप सरकारने गोव्याची दुर्दशा केली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात बेरोजगारी वाढली आहे, महत्त्वाचे असे पर्यटनक्षेत्र पूर्णपणे ढासळलेले आहे. या सर्व गोष्टीला भाजप सरकार जबाबदार असून, येणाऱ्या निवडणुकीत गोव्याची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा शुक्रवारी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात पुढे भाजपविरोधातील जे सरकार येईल, त्या सरकारात आम्ही निश्चितरित्या असणार आहोत. चांगले लोकाभिमुख सरकार राज्यात देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. बेरोजगारीची समस्या सोडविण्यावर आमचा भर आहे, योग्य पर्यटन धोरण, व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे, असे मलिक यांनी पुढे सांगितले.

भाजपमध्ये सध्याच्या स्थितीला डॉ. प्रमोद सावंत वगळता सर्व उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून विकत घेतलेले आहेत. यावरून स्पष्ट होते की, भाजपकडे त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते देखील नाहीत. बाबूशसारखे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार भाजपने यंदा रिंगणात उभे केले आहेत, भाजप ते उमेदवार सुधारले  म्हणत असेल, तर त्यांनी लोकांना दाखवून द्यावे की, कुठल्या गंगेत त्यांनी अंघोळ केल्याने त्यांचे पाप धुतले गेले आहे ते. त्याचप्रमाणे वंशवादही सर्वात जास्त भाजपमध्येच दिसून येतो, असेही मलिक यांनी पुढे सांगितले.

नमस्ते ट्रम्प उपक्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाला

कोरोना जेव्हा जगभर पसरत होता, तेव्हा आम्ही मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचे सुचविले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण त्यावेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम मोदी सरकार ट्रम्पला खूश करण्यासाठी करत होते आणि यातूनच कोरोनाचा प्रसार देशात झाला. तसेच लॉकडाऊन राज्य सरकारने करायला सुरुवात केली, असे मोदी म्हणत असले तरी, लॉकडाऊनबाबत केंद्राने स्वत:कडेच अधिकार ठेवले होते. त्यामुळे मोदींनी उगाच कसलीही विधाने करून लोकांची दिशाभूल करू नये. ज्याप्रकारे लसींसाठी मोदी जबाबदार आहेत, तसेच कोरोना काळातील मृत्यूसाठीही मोदीच जबाबदार आहेत.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस