शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: “गोवेकर जनतेला केवळ काँग्रेसच न्याय देऊ शकते”; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:32 IST

Goa Election 2022: डॉ. प्रमोद सावंंत यांंच्याविरोधात जनतेमध्ये बरेच विरोधी वातावरण दिसून येतेय, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :  जनतेला न्याय केवळ काॅंग्रेस सरकारच देऊ शकते. काॅंग्रेसच गोव्याचा विकास करु शकते, असा विश्वास  महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण साखळी भागाचा दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री तथा भाजपचे साखळीचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंंत यांंच्याविरोधात जनतेमध्ये बरेच विरोधी वातावरण दिसून येते. यावरुन काॅंग्रेसवर असलेला जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होते, असे त्यांंनी सांगितले.

पटोले म्हणाले की, खाणी बंंद झाल्याने खाण अवलंंबितांंवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांंना आपले दागिने गहाण ठेवावे लागले. मात्र,  खाणी सुरु करण्यासाठी झालेल्या अपुऱ्या प्रयत्नांंमुळे जनतेला  खाण बंदीच्या माध्यमातून भाजप सरकारचा खरा चेहरा दिसून आला. ज्या पर्यटनासाठी गोवा ओळखला जायचा, त्याच पर्यटनाला आता फटका बसला आहे तर दुसरीकडे पर्यावरणाचासुध्दा ऱ्हास झाला आहे. गोवा सध्या बेरोजगारीसाठी अधिक ओळखला जात असल्याची टीका त्यांंनी केली.

गोव्यात  निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्ष उतरले असले तरी काॅंग्रेसच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काॅंग्रेसच जनतेला न्याय देऊ शकते व गोव्याचा विकास करु शकते. अन्य पक्ष केवळ काॅंग्रेसच्या मतांंचे विभाजन करण्यासाठी आल्याचे स्पष्ट होते. राज्यातील असो किंवा केंंद्रातील सरकार असो त्यांंनी काय काम केले, हे जनतेच्या समोर आहे. 

केंद्रातील भाजप सरकारने केवळ लोकशाही ढासळण्याचे तसेच अभिव्यक्ती स्वातंंत्र्यावर गदा आणण्याचे काम केले, असा आरोप पटोले यांंनी केला. यावेळी काॅंग्रेस नेते तौफिक मुल्लानी, श्रीनिवास खलप, सुनील कवठणकर व अन्य नेते उपस्थित होते. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले