शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : तृणमूलला गुड बाय करत भाजपमध्ये प्रवेश, कळंगुटमध्ये जोझेफ सिक्वेरांना भाजपकडून उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 21:26 IST

Goa Election 2022 : मायकल लोबोंशी देणार टक्‍कर. भाजपला लोबोंशी टक्कर देणारा प्रबळ उमेदवार कळंगुटमध्ये मिळत नव्हता. अखेर सिक्वेरा यांना पक्षाने गळाला लावले.

पणजी : कळंगुटमध्ये राजकारणाने वेगळे वळण घेतले असून जोझेफ सिक्वेरा हे आता भाजपचे उमेदवार असतील आणि मायकल लोबो यांच्याशी टक्कर देतील. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी जोझेफ यांची सकाळी बैठक झाली आणि सायंकाळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जोझेफ हे काँग्रेस बंडखोर गटात होते. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस तसेच ॲंथनी मिनेझिस यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वीच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने मायकल लोबो यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केल्याने हे तिघेजण बरेच नाराज झाले होते. 

याच नाराजीतून त्यांनी तृणमूलध्ये प्रवेश केला होता. परंतु आता आग्नेल व अँथनी या आपल्या साथीदारांना ठेंगा दाखवत जोझेफ यांनी तृणमूललाही बाय-बाय केले आहे. भाजपच्या उमेदवारांची‌ दुसरी यादी आज सायंकाळी जाहीर होणार आहे. त्यात जोझेफ यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपला लोबोंशी टक्कर देणारा प्रबळ उमेदवार कळंगुटमध्ये मिळत नव्हता. अखेर सिक्वेरा यांना पक्षाने गळाला लावले. जोझेफ यांनी २०१७ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती. परंतु लोबो यांच्याकडून त्यांना ३८२८ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. लोबो यांना भाजपच्या तिकिटावर त्यावेळी ११,१३६ तर जोझेफ यांना काँग्रेसच्या तिकिटावर ७,३११ मते मिळाली होती. येत्या निवडणुकीतही दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील, परंतु केवळ पक्षांची अदलाबदल असेल.

"पार्सेकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालूच"दरम्यान, मांद्रे मतदारसंघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मन वळवण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न चालूच ठेवले आहेत. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती देताना सांगितले की, ''पार्सेकर यांच्याशी आमची बोलणी अजून चालूच आहेत. त्यांनी निर्णय बदलावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि यात आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे.''

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत