शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: आता पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही, पक्षांतर गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही; पक्षनेते ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 11:26 IST

Goa Election 2022: एकदा पक्ष सोडून गेलेल्यांना पुुन्हा संधी न देण्याची भूमिका गोवा काँग्रेस घेतल्याचे सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

फोंडा : ‘आता पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही. पक्षांतर करून निघून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, या मतावर आम्ही ठाम राहिलो. आलेक्स रेजिनाल्ड यांचीही आम्ही गय केली नाही’ असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. मडकई मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार लवू मामलेदार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. 

प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले, ‘उमेदवारी जाहीर करण्याबाबतीत आम्ही इतर पक्षांना मागे टाकले आहे. एकदा पक्ष सोडून गेलेल्यांना पुुन्हा संधी न देण्याची भूमिका आम्ही घेतली. जेव्हा रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र भाजपमध्ये जाताच आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना डावलून नवे नेतृत्व उभे केले. राज्यात सध्या काँग्रेसची लाट आली आहे. त्या लाटेच्या जोरावर यावेळी मडकईत बदल नक्कीच घडेल’ असे चोडणकर म्हणाले. 

काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार लवू मामलेदार म्हणाले, ‘अख्ख्या राज्याचा दौरा करून मडकईत आल्यानंतर इथल्या लोकप्रतिनिधीने हा मतदारसंघ जाणून-बुजून मागास ठेवल्याचे तुमच्या लक्षात येईल. इथे समस्यांचा डोंगर आहे. मतदारांना लाचार करण्यापलीकडे इथल्या आमदाराने काहीच केले नाही.’ प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस त्रिबोल डिसोझा  यांचे भाषण झाले. गटाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर यांनी स्वागत केले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस