शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : गेम झाला! काँग्रेस सोडून तृणमूलच्या गोटात; मग पुन्हा माघारीच्या विचारात; आता ना घर का, ना घाट का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 07:54 IST

तृणमूल काँग्रेसमध्ये माझी केवळ घुसमट आणि भ्रमनिरासच झाला; मी चुकलो, मला माफ करा, असं ते यापूर्वी म्हणाले होते.

पणजी : उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केलेले आलेक्स रेजिनाल्ड यांनी घरवापसीची तयारी केल्यानंतरही त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने कुडतरीत मॉरेन रिबेलो यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेस पक्षाची उमेदवारीची पाचवी यादी जाहीर झाली आहे. त्यात कुडतरीचे उमेदवार म्हणून मॉरेन रिबेलो यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे  रेजिनाल्ड यांचा पत्ता कापला गेला आहे. जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या यादीत शिवोली मतदारसंघात मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो, साळगावात केदार नाईक, हळदोणेत कार्लोस आल्वारीस फारिया तर प्रियोळात दिनेश जल्मी यांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत.

रेजिनाल्ड अपक्ष लढणार‘ना घर का, ना घाट का’ अशी स्थिती झालेल्या माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी अखेर कुडतरी मतदारसंघात अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने कुडतरीतील आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर रेजिनाल्ड यांनी तातडीने आपले  समर्थक व कार्यकर्त्यांची  बैठक  बोलावून पुढील रणनीती ठरवली. कार्यकर्ते व समर्थकांच्या आग्रहासाठी आपण अपक्ष लढणार, असे त्यांनी त्यानंतर जाहीर केले.  

आपण तीन वेळा आमदार म्हणून  निवडून आलो; पण कुडतरी मतदारसंघाला एकही वेळा मंत्रिपद मिळवून देऊ शकलो नाही. विधानसभेत जास्त काळ विरोधी गटाच्या बाकावर बसून काढला. सरकारच्या विरोधात आवाज उठविला.  विरोधी पक्षनेते जेवढा आवाज उठवू शकले  नाहीत, त्याच्या पलीकडे जाऊन आपण सरकारच्या विरोधात आवाज उठविलेला आहे; पण विरोधी बाकावर बसून कुठलाही आमदार अपेक्षेप्रमाणे मतदारसंघाचा व लोकांचा विकास करू शकत नाही. गेली अनेक वर्षे आपल्याला ही खंत सतावत होती. त्यामुळे आपण  पक्ष बदलाचा निर्णय घेतला होता व तृणमूलमध्ये प्रवेश केला; परंतु महिनाभरातच आपल्याला तृणमूलमध्ये वातावरण एकदम गढूळ असल्याचे कळून चुकले, असे ते म्हणाले.

मांद्रे गोवा फॉरवर्डलाकॉंग्रेसने शेवटी मांद्रेतील जागा गोवा फॉरवर्डसाठी सोडली आहे. तशी माहिती कॉंग्रेसचे  प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी दिली. गोवा  फॉरवर्डने आग्रह धरलेल्या चार मतदारसंघांपैकी मांद्रे  एक होता.  गोवा फॉरवर्डतर्फे दीपक कलंगूटकर लढणार आहेत.   

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसtmcठाणे महापालिका