शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

Goa Election 2022: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात रंगत; गोव्यात अपक्ष उमेदवारीने उत्सुकता, हॅट्रटिक होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:41 IST

Goa Election 2022: गोवा काँग्रेसला बालेकिल्ल्यातील लढत सोपी ठरणार नाही, असे सांगितले जात आहे.

सूरज पवार, लोकमत न्यूज नेटवर्क

मडगाव : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कुडतरी मतदारसंघात या खेपेला रंगतदार लढत होणार आहे. मतदारसंघात विजयाची हॅट्रटिक साधलेल्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना या खेपेला अपक्ष म्हणून येथील उमेदवार स्वीकारतील, यावेळीही हे मतदार काँग्रेसच्या बाजूनेच उभे राहतील, याचे उत्तर नंतरच मिळेल. मात्र, सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. 

पूर्वी कुडतरी मतदारसंघ युनायटेड गोवन्स पार्टीचा बालेकिल्ला होता. १९७७च्या निवडणुकीत काँग्रेसने त्याला खिंडार पाडले. फ्रान्सिस सार्दिन हे त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. नंतर सार्दिन यांनी मागे वळून बघितलेच नाही. ओळीने चार विधानसभा निवडणुकीत ते येथून आमदार बनले. १९९४च्या निवडणुकीत मात्र त्यांना अनपेक्षितरित्या  पराभव पत्कारावा लागला होता. युगोडेपाच्या आंतोन गावकर यांनी त्यांचा पराभव केला. नंतर १९९९च्या निवडणुकीत सार्दीन यांनी आपल्या पराभवाचे उट्टे काढताना गावकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. २००२ मध्येही सार्दीन हेच निवडून आले. 

मात्र २००७च्या निवडणुकीत सेव्ह गोवा फ्रन्टचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी त्यांचा पराभव केला. नंतर २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीत लॉरेन्स यांनी आपली विजयाची पताका कायम ठेवली. आताही काँग्रेस पक्षाने आलेक्स लॉरेन्स यांनाच उमेदवारी घोषित केली होती. मात्र, अचानक त्यांनी आमदारकीचा रजीनामा देऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अवघ्या २७ दिवसानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षालाही गुडबाय केले. आता ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत.

आलेक्स लॉरेन्स यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. मात्र, मतदार  त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून कितपत स्वीकारतील हेही बघावे लागेल. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य मोरेन रिबेलो यांना मिळाली आहे. त्यांनी आपल्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. फ्रान्सिस सार्दिन यांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. ते मोरेन यांच्यासाठी कितपत काम करतात, हेही प्रश्नचिन्ह आहे. सार्दिन यांचा पुत्र शॅलोम हा कुडतरीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा दावेदार होता. शॅलोमला उमेदवारी मिळवून देण्यासाठी सार्दिन यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे सार्दीन आतून दुखावले आहेत.

आम आदमी पार्टीचे डॉम्निक गावकर हेही तुल्यबळ उमेदवार आहेत. राय, राशोल, कामुर्ली आदी पंचायतींवर त्यांचे वर्चस्व आहे. ते एसटी समाजाचे आहेत. या समाजाचे कुडतरी मतदारसंघात प्राबल्य आहे. भाजपनेही याच समाजाचा अँथनी बार्बोझ यांना उमेदवारी दिली आहे. कुडतरीत भाजपला स्थान नाही. मात्र, पक्षाने ख्रिश्चन धर्मातील एसटी समाजाचा उमेदवार दिल्याने व आता या मतदारसंघातील काही भागांमध्ये हिंदू मतदारांचीही संख्या वाढत असल्याने भाजपला विजयाची आशा वाटत आहे. तृणमूल काँग्रेसने अँथनी पिशोत, तर रुबेन पेरेरा यांना आरजीने उमेदवारी दिली आहे. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस