शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Goa Election 2022: काँग्रेसकडून रिजेक्टेड उमेदवार निवडणूक रिंगणात; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 22:57 IST

Goa Election 2022: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २२ जागा हे घोषवाक्य सत्यात उतरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मडगाव : काँग्रेसने रिजेक्टेड उमेदवार पुन्हा उभे केले आहेत. दोन-तीन चेहरे सोडले तर तेच चेहरे असून, फिक्सिंग करुन त्यांना तिकिटे दिली आहेत. दिगंबर कामत यांना हरविण्यासाठीच आम्ही बाबू आजगावकर यांना मडगावात उमेदवारी दिल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हा भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सासष्टीत या खेपेला कमळ फुलेल, असे सांगून आगामी सरकार हे भाजपचे असेल. पूर्ण बहुमताचे सरकार स्थापनेसाठी मतदारांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, दामू नाईक, सावियो रॉड्रिगीस, उल्हास तुयेकर, दामोदर बांदोडकर, अँथनी बार्बाेझ, दत्ता बोरकर हे सासष्टीतील मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार व उर्फान मुल्ला हे पत्रकार परिषदेत हजर होते.

सासष्टीत भाजपला अनुकूल वातावरण आहे. बाबू आजगावकर हे आगामी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील, दामू नाईक हेही मंत्री असतील, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. सालसेत मिशनची यावेळी गरज दिसली नाही. येथील मतदार भाजप समवेत आहेत. आमचे काही उमेदवार नवखे असले तरी ते विजयी होणार, त्याबाबत कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढचे सरकार हे भाजपचेच असून, प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले. मडगावकरांना बदल हवा आहे, या मतदारसंघात विकास झालेला नाही. आपण पेडणे नंबर १ मतदारसंघ केला, मडगावही तसाच व्हायला पाहिजे, मडगावात आपल्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे ते म्हणाले. दामू नाईक यांनी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २२ जागा हे घोषवाक्य सत्यात उतरेल, असे सांगितले. पूर्ण बहुमताचे सरकार असेल. राज्याला स्थिर सरकार पाहिजे, भाजप ते देईल, असे सांगितले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत