शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

Goa Election 2022: भाजपचे टेन्शन वाढले! पणजीत उत्पल पर्रिकरांना पाठिंबा वाढतोय; बाबूश मोन्सेरातसमोर कडवे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 10:13 IST

Goa Election 2022: उत्पलची उघड बंडखोरी तसेच वेगवेगळ्या घटकांकडून त्यांना मिळणारा वाढत पाठिंबा पाहता बाबूश यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. 

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : तिसवाडी तालुक्यात बंडखोरीचा फटका भाजप उमेदवारांनाच अधिक जाणवणार आहे. कुंभारजुवे आणि सांताक्रूझ मतदारसंघांमध्ये भाजपला उमेदवार जाहीर करण्यास लागलेल्या विलंबास बंडखोरीची भीती हेच कारण असल्याचे मानले जाते. पणजीत भाजपने बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी दिल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी बंड करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. सिध्दार्थ कुंकळ्येंकर वगैरे बाबुश यांच्या विरोधात आहेत. 

काँग्रेसने तिकीट नाकारलरेले माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी उत्पल यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उत्पल यांनी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचेही आशीर्वाद घेतले आहेत. उत्पलची उघड बंडखोरी तसेच वेगवेगळ्या घटकांकडून त्यांना मिळणारा वाढत पाठिंबा पाहता बाबूश यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. 

जेनिफर यांच्यासमोर आव्हान

ताळगाव मतदारसंघात जेनिफर मोन्सेरात यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, परंतु भाजपचे ताळगाव मंडल कार्यकर्ते जेनिफर यांच्यासाठी तसे अनुकूल नाहीत. दत्तप्रसाद नाईक व मंडळी उघडपणे बंड दाखविले आहे. दत्तप्रसाद यांनी गेल्या पाच वर्षात लोकांचे विषय घेऊन विविध आंदोलने केली. या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांच्याप्रती असलेल्या व्यक्तीनिष्ठेच्या जोरावर गेल्यावेळी बाजी मारलेल्या जेनिफर यांना यावेळी विजयासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. कॉंग्रेसतर्फे माजी महापौर टोनी रॉड्रिग्स यांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्षातर्फे युवा नृत्य शिक्षिका सिसील रॉड्रिग्स रिंगणात आहेत. त्यांनीही बराच जोर लावला आहे.  दत्तप्रसाद यांचा २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ १०५० मतांनी पराभव झाला होता. २०१७ मध्येही भाजपने त्यांना पुन: तिकीट दिले, परंतु या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. 

कुंभारजुवे, सांत आंद्रेत उमेदवारीसाठीच टशन 

कुंभारजुवें मतदारसंघात आमदार पांडुरंग मडकईकर यांना भाजपने डावलल्यास ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील हे स्पष्ट आहे. शिवाय रोहन हरमलकर यांनीही भाजपने आपल्याला तिकीट न दिल्यास बंडाची भूमिका जाहीर केली आहे. या मतदारसंघात बंडखोरीच्या भीतीनेच भाजपला उमेदवार जाहीर करण्यास विलंब लागला. 

तर सांत आंद्रे मतदारसंघात भाजप मंडलचे अनेक कार्यकर्ते रामराव वाघ यांच्यासोबत आहेत. वाघ यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आपमध्ये प्रवेश केला आणि ते आपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे केडरचे नाहीत. काँग्रेसमधून उमेदवार आयात केल्याने भाजपचे निष्ठावान आणि केडरचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाहीत. 

तर सांताक्रूझ मतदारसंघ कधीही भाजपकडे नव्हता. या मतदारसंघात काँग्रेसने सहा वेळा विजय प्राप्त केलेला आहे. भाजपने या मतदारसंघातही अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. विद्यमान आमदार टोनी फर्नांडिस यांना तिकीट नाकारल्यास ते काय भूमिका घेतील हे पाहावे लागेल. भाजप उमेदवारीसाठी जि. पं. सदस्य गिरीश उस्कैकर, पक्षाच्या ओबीसी विभागाचे नेते अनिल होबळे आदी दावेदार आहेत.

 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाUtpal Parrikarउत्पल पर्रिकर