शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: “माझ्याविरोधात कोण आहे याने फरक पडत नाही”; बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 09:56 IST

Goa Election 2022: गेल्या २० वर्षांपासून जनतेची सेवा करतोय. विराेधकांंची मला पर्वा नाही, असे बाबूश मोन्सेरात यांंनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : मला विराेधकांंची पर्वा नाही. माझ्याविरोधात कोण निवडणूक   लढवत आहे, याचा मला फरक पडत नाही. लोकांंच्या सेवेसाठी मी नेहमीच काम सुरुच ठेवणार आहे’ असे पणजीचे भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांंनी  स्पष्ट केले. 

पणजी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात  प्रचार करीत आहेत. बॉक द व्हाक परिसराला भेट दिली. माजी आमदार सिद्धार्थ कुंंकळ्येकर यांंच्या घरी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांंनी कुंकळ्येकर यांच्याकडे पाठिंंब्याचे आवाहन केले. मोन्सेरात  म्हणाले, ‘गेल्या २० वर्षांपासून मी जनतेची सेवा करीत आहे. त्यामुळे लोक मला निवडणुकीत जिंंकून आणतील, याची आपल्याला खात्री आहे.’

मोन्सेरात म्हणाले, माझ्या विरोधात निवडणुकीत कोण उतरले आहे, माझ्या विरोधात कोण निवडणूक लढवत आहे याचा मला फरक पडत नाही. केवळ निवडणुका जवळ येताच मी माझ्या मतदारांंची भेट  घेत नाही तर मी नेहमीच माझ्या मतदारांंच्या संंपर्कात असतो.  या काळात त्यांंच्या समस्या मी जाणून घेतो. मी इतकी वर्षे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने मी नक्की  कसा आहे हे जनतेला ठाऊक आहे.’ जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी त्यांंच्यासोबत पणजी महानगरपालिकेच्या नगरसेवक  दीक्षा माईणकर तसेच भाजपचे कार्यकर्ते हजर होते. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा