शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Goa Election 2022: भाजप सरकारमधील मंत्र्याच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ; आप नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 09:43 IST

Goa Election 2022: गोव्याच्या वीज मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाली, पण गोव्याला मोफत वीज मिळू शकत नाही, असे अमित पालयेकर यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : वीज मंत्री नीलेश काब्राल यांच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ झाल्याने गोव्याला मोफत वीज का मिळत नाही हे स्पष्ट होते, असे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पालेकर यांनी नमूद केले की काब्रालच्या २०१५-२०१६ च्या संपत्ती  एकूण उत्पन्न रु. ९,५०,४७४ , तर त्याच्या २०१९-२०२० मध्ये त्याचे एकूण उत्पन्न रु. ३,१९,७२,६३२ आहे. हे ३००० टक्के वाढ दर्शवते. पालेकर म्हणाले की, काब्राल यांना ‘२५ दिन में पैसा डबल योजना’ माहीत आहे असा टोमणा त्यांनी मारला. 

पालेकर म्हणाले की, बहुतेकांनी आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोफत वीज देण्याच्या आश्वासनावर टीका केली. मात्र, भ्रष्टाचार संपवला तर गोव्याला मोफत वीज देणे शक्य आहे, असे ‘आप’कडून वारंवार सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा राजकारण्यांच्या खिशात जात आहे. पाच वर्षांत काब्रालचे उत्पन्न तिपटीने वाढले यावरून भाजपचे मंत्री भ्रष्टाचारात किती गुंतले आहेत हे दिसून येते.

पालेकर यांनी गोवेकरांना काब्राल यांच्यापर्यंत पैसे घेऊन जाण्याचे आवाहन केले. काब्रालला “२५ दिन में पैसा डबल योजना” माहीत असल्याने ते पैसे दुप्पट करतील. “गोव्याचे बजेट २१,०५६.३५ कोटी रुपये आहे आणि प्रत्येक गोमंतकीवर १,४०.००० रुपये खर्च करण्यात येते . काब्रालच्या संपत्तीत झालेली वाढ पाहिल्यानंतर तो पैसा कुठे गेला हे लक्षात येईल. अशा गब्बरांना बाहेर काढण्याची गरज आहे. काब्राल हेराफेरी भाग ३ साठी तयारी करत आहेत. आता कुडचडेच्या  लोकांनी मतदारसंघाच्या भल्यासाठी ‘आप’ला मत देण्याची ही संधी घेणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.

आप कुडचडेचे उमेदवार गॅब्रिएल फर्नांडिस म्हणाले की, काब्राल यांनी २०१२ मध्ये खाण बायपासचे आश्वासन दिले होते, परंतु प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे.  बसस्थानक प्रकल्प, क्रीडा संकुल किंवा रवींद्र भवन अद्याप पूर्ण केलेले नाही.   

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Pramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा