शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

Goa Election 2022: आम आदमी पार्टीचा ‘१३-सूत्री’ वचननामा; प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 9:45 AM

Goa Election 2022: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘१३-सूत्री गोवा मॉडेल’ या जाहीरनाम्याचे अनावरण केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

पणजी :आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ‘१३-सूत्री गोवा मॉडेल’ या जाहीरनाम्याचे अनावरण केले. या १३ मुद्यावर आप गोव्यात विधानसभा निवडणूक लढणार आहे. 

यावेळी केजरीवाल म्हणाले की, ‘आप’ने सरकार बनवल्यास  गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षांत १० लाखांचा लाभ मिळेल. तसेच तरुणांना रोजगार, गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकऱ्या तसेच प्रत्येकी ३००० रुपये बेरोजगारी भत्ता आदी मुद्यांचा या वचननाम्यात समावेश असल्याचे त्यानी सांगितले.खाणकाम सहा महिन्यांत पुन्हा सुरू केले जाईल. तसेच त्याच कालावधीत जमिनीच्या हक्कांचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासनही या जाहीरनाम्यातून दिले आहे.

केजरीवाल पुढे म्हणाले की, आता मतदारांनी ठरवायचे आहे की त्यांना ५००० रुपयांना बळी पडायचे आहे की पाच वर्षांत १० लाखांचा फायदा होईल, अशा प्रामाणिक पक्षाला निवडायचे याचा निर्णय घ्यावा. जेव्हा आप सरकार स्थापन करेल, तेव्हा आम्ही एक नवीन गोवा निर्माण करू, जो इतिहास नष्ट न करता समृद्ध आणि विकासाला चालना देणारे राज्य निर्माण करण्यावर भर राहिल, असे ते म्हणाले.

ही आहेत वचने

- प्रत्येक कुटुंबाला पाच वर्षांत १० लाखांचा लाभ- तरुणांना रोजगार- गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकऱ्या- प्रत्येकी ३००० रुपये बेरोजगारी भत्ता- शाळांची स्थिती सुधारणा- मोफत शिक्षण- रुग्णालयांची स्थिती सुधारणा- मोहल्ला क्लिनिक सुरू करणार- १८ वर्षांवरील महिलांना रु. १००० प्रति महिना- उद्योगानुकूल धोरण- २४ तास मोफत वीज- अखंड पाणीपुरवठा- चांगले रस्ते 

प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा लाभ

एखाद्या कुटुंबाला रु. ५०० वीज बिल येते असे गृहीत धरले, तर वार्षिक ६ हजार भरते. मोफत वीज धोरणानुसार ही रक्कम माफ होईल. ३ हजार बेरोजगारी भत्त्यानुसार वार्षिक ३६ हजार मिळतील. महिलेला दरमहा १ हजार त्यानुसार वार्षिक २४ हजार, मोफत आरोग्य सेवेनुसार वार्षिक ४०  ते ५० हजार वाचतील. मोफत शिक्षणानुसार वार्षिक ७२ हजार वाचतील. ही सर्व रक्कम एकत्रित केल्यास पाच वर्षात दहा लाख होते, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी