गोव्याची आर्थिक स्थिती उत्तम; देशात तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2025 16:31 IST2025-01-26T16:30:42+5:302025-01-26T16:31:19+5:30
कमी कामगिरी करणाऱ्या राज्यांनी त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी संरचनात्मक सुधारणा आणि विवेकी वित्तीय धोरणे स्वीकारण्याची शिफारसही आहे.

गोव्याची आर्थिक स्थिती उत्तम; देशात तिसरा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: नीती आयोगाच्या पहिल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक २०२५ मध्ये गोव्याने तिसरे स्थान पटकावले आहे. १८ प्रमुख राज्यांच्या वित्तीय कामगिरीच्या मूल्यांकनात ५३.६ च्या गुणांसह, गोवा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या क्रमवारीत ओडिशा (६७.८) प्रथम आणि छत्तीसगढ (५५.२) दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. खर्चाची गुणवत्ता, महसूल एकत्रित करणे, वित्तीय विवेक, कर्ज निर्देशांक आणि कर्जाची शाश्वतता यात गोव्याची मजबूत कामगिरी ठरली. वित्तीय व्यवस्थापन, महसूल निर्मिती आणि कमी कर्जाचा भार यामुळे गोवा सरस ठरला आहे. कमी कामगिरी करणाऱ्या राज्यांनी त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी संरचनात्मक सुधारणा आणि विवेकी वित्तीय धोरणे स्वीकारण्याची शिफारसही आहे.
गोव्याचे मजबूत आर्थिक आरोग्य हे राज्याच्या प्रभावी प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापनाचे प्रमाण आहे. राज्याची कामगिरी इतर राज्यांना त्यांचे राजकोषीय आरोग्य सुधारण्यासाठी अशाच प्रकारच्या धोरणांचा अवलंब करण्यास प्रेरित करेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.