गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प तूर्तास बंद; शेतकरी नाराज
By आप्पा बुवा | Updated: August 21, 2023 18:32 IST2023-08-21T18:32:39+5:302023-08-21T18:32:55+5:30
मारसवाडा उसगाव येथे गोवा डेरी चा पशुखाद्य प्रकल्प आहे. जिथे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागणारे पशुखाद्य कमी दरात उपलब्ध करून देण्यात येत होते

गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प तूर्तास बंद; शेतकरी नाराज
फोंडा - गोवा डेअरीच्या अख्यारीत येणारा पशुखाद्य प्रकल्प सध्या तात्पुरता बंद ठेवला असून गोवा डेरीच्या प्रशासनाने सुद्धा त्याला दुजोरा दिला आहे. उसगाव येथील सदरचा प्रकल्प बंद ठेवल्याकारणाने शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्तानुसार मारसवाडा उसगाव येथे गोवा डेरी चा पशुखाद्य प्रकल्प आहे. जिथे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागणारे पशुखाद्य कमी दरात उपलब्ध करून देण्यात येत होते. मार्केटमध्ये हे पशुखाद्य तसे महागच आहे. परिणामी शेतकऱ्यांना प्रकल्पात निर्माण होणाऱ्या पशुखाद्यामुळे थोडासा दिलासा मिळत होता. परंतु मागच्या एक महिन्यापासून सदरचा प्रकल्प बंद ठेवण्यात आलेला आहे. जो काही कच्चा महाल प्रकल्पात उपलब्ध होता तो संपल्यानंतर कारखाना तूर्तास तरी बंद आहे.
या संदर्भात गोवा डेरीच्या प्रशासनाकडे संपर्क साधला असता त्यांनी कारखाना बंद असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तो काही कायमचा बंध नाही तर भविष्यात पुन्हा सुरू स्वतः होऊ शकतो असे सांगितले. पशुखाद्य प्रकल्पात कामाला असलेले सुमारे 25 कामगारांना सध्या सुरक्षा रक्षक व इतर कामे करण्यासाठी गोवा डेरी मध्ये आणले आहे. येथे जी सुरक्षा रक्षक एजन्सी होती त्यांचे कंत्राट बंद करून सध्या पशुखाद्य प्रकल्पातील कामगाराद्वारे सुरक्षा पुरवली जात आहे. असे करण्याने पगारावर जो अतिरिक्त भार गोवा डेअरी वर पडत होता तो कमी झाला आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांनाच मिळणार असल्याचे सुतोवाच प्रशासनाने केले आहे.