शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गोव्याच्या दाबोळी विमानतळावर महिलेकडून १८ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 17:24 IST

गोव्याच्या दाबोळी विमानतळावर सोमवारी (11 फेब्रुवारी) पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडिया विमानातील एका महिला प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 लाख 8 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले.

वास्को - गोव्याच्या दाबोळी विमानतळावर सोमवारी (11 फेब्रुवारी) पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडिया विमानातील एका महिला प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 लाख 8 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. या महिला प्रवाशावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने दाबोळी विमानतळावर तिची कसून तपासणी केली. यादरम्यान, महिलेकडे तस्करीचे सोने पेस्ट पद्धतीने एका पाकिटात आपल्या कमरेला बांधून आणल्याचे उघड झाले.  तिला ताब्यात घेऊन कस्टम कायद्यांतर्गत सोने जप्त केले.

दाबोळी विमानतळावर येणार असलेल्या एका आंतरराष्ट्रीय विमानातून तस्करीचे सोने येणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळताच त्यांनी सापळा रचला. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया (एआय ९९४) विमानातील प्रवाशांची येथे तपासणी करण्यात येत असताना कस्टम विभागाला एका महिला प्रवाशाच्या हालचालीवर संशय आल्याने तिची येथे कसून तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपल्या कमरेला एक पाकीट बांधून आणल्याचे दिसून आल्यानंतर ते काढून पाकिटाची तपासणी केली असता यात ‘पेस्ट’ पद्धतीत ५९० ग्रॅम सोने असल्याचे उघड झाले.

यानंतर कस्टम विभागाने याबाबत त्या महिलेशी कसून तपासणी केली असता हे सोने तस्करीने आणल्याचे स्पष्ट झाल्याने सदर सोने कस्टम कायद्याखाली जप्त करण्यात आले. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे कमिश्नर आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकमिश्नर डॉ. राघवेंद्र पी व इतर कस्टम अधिका-यांनी सदर कारवाई केली. हे सोने दाबोळी विमानतळावर आणल्यानंतर येथून ते कुठे नेण्यात येणार होते याबाबत कस्टम अधिकारी अधिक तपास करीत आहेत.एप्रिल २०१८ ते आतापर्यंत दाबोळीवर कस्टम अधिका-यांनी केले २ कोटी ३६ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

गोव्याच्या दाबोळी विमानतळावर कस्टम अधिका-यांनी विविध कारवाई करत एप्रिल २०१८ ते अद्यापपर्यंत अशा आर्थिक वर्षाच्या काळात विविध प्रवाशांकडून एकूण २ कोटी ३६ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी उपलब्ध केली आहे. याबरोबरच या आर्थिक वर्षाच्या काळात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी विविध कारवाईत बेकायदेशीररित्या प्रवाशांकडून नेण्यात येत असलेली ६७.५ लाख रुपये किंमतीची विविध विदेशी चलनेसुद्धा जप्त केली असल्याची माहिती उघड झालेली आहे.

 

टॅग्स :goaगोवाGoldसोनंCrime Newsगुन्हेगारी