गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा मावळ व पेण येथे झंझावात
By किशोर कुबल | Updated: February 27, 2024 20:35 IST2024-02-27T20:34:01+5:302024-02-27T20:35:28+5:30
- कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन ; बूथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलनातही संबोधले.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा मावळ व पेण येथे झंझावात
किशोर कुबल, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत लोकसभा निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रात दौय्रावर असून काल त्यांनी मावळ मतदारसंघात तेथील कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केले तसेच सायंकाळी पेण येथे बूथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलनात संबोधले.
मावळ येथे संवादाच्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात विरोधी आमदारांनी विकासासाठी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्रातही त्याची पुनरावृत्ती झाली. विकासाच्या मुद्यावरच विरोधी पक्षांमधील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. गोवा आणि महाराष्ट्रात राज्यात व केंद्रात असे डबल इंजिन सरकार आहे त्यामुळे विकासाला चालना मिळत आहे.
भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर काही मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या आठवड्यात ते दक्षिण भारतात केरळ, पुड्डुचेरी दौऱ्यावर होते.