पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आपण होम आयसोलेशनमध्ये राहणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र माझ्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत. त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी घरातूनच माझं काम करेन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आवश्यक ती काळजी घ्यावी,' असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
CoronaVirus News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 11:41 IST