शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची 'ती' कथित व्हिडीओ कॉन्फरन्स वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 11:33 IST

पर्रीकरांच्या बैठकीवरुन काँग्रेस आक्रमक

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेतली, असा दावा आयपीबीच्या काही सदस्यांनी केला आहे. पर्रीकर यांची ही कथित बैठक गोव्यात मोठ्या वादाचा विषय झाली आहे. काँग्रेस पक्ष तर या विषयावरून आक्रमक झाला असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेरावही घालून तीव्र निषेध व्यक्त केला.मुख्यमंत्री पर्रीकर आजारी आहेत. ते मंत्रालयात देखील येऊ शकत नाहीत. ते त्यांच्या दोनापावल येथील निवासस्थानीच असतात. मंत्रिमंडळाच्या बैठका अनेक महिने झालेल्या नाहीत. मंत्री, आमदारांना त्यांची भेट मिळत नाही. मग त्यांनी आयपीबीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेतली हा दावा लोकांना पटेल तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीगीज यांनी सरकारचा दावा खोटा असल्याचे सांगितले व चार तासाच्या आयपीबी बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींग केलेलेच नाही, असा दावा रॉड्रीग्ज यांनी केला.व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक घेतल्याचे सांगणाऱ्या सरकारने व आयपीबीने त्याबाबतचे पुरावे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी अमरनाथ पणजीकर आदींनी जाहीरपणे केली आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्षपद हे मुख्यमंत्री या नात्याने पर्रीकर यांच्याकडे आहे. मंडळाची बैठक फक्त अध्यक्षच घेऊ शकतात. उपाध्यक्ष किंवा इतरांना बैठक घेण्याचा अधिकार नाही. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आठ ते नऊ उद्योगांचे व प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. सुमारे दोनशे कोटींची गुंतवणूक गोव्यात येईल, असे सांगितले जाते. मात्र त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पर्रीकर नव्हते, असे विरोधी पक्षाचे व काही सामाजिक कार्यकर्त्यांचेदेखील म्हणणे आहे. मुळात आयपीबीच्या बैठका पूर्वी सचिवालयात तथा मंत्रालयात होत असत. यावेळी आल्तिनो येथे माहिती तंत्रज्ञान खात्याच्या कार्यालयात बैठक घेतली गेली. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक घेतली, याचे पुरावे सरकार किंवा आयपीबी अजून देऊ शकलेले नाही. हा विषय न्यायालयातही पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्रीकर जर व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक घेऊ शकतात, तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आमच्याशी संवाद साधावा, आमचे काही प्रश्न आहेत, असे आमदार रेजिनाल्ड म्हणाले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस