शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

गोव्यात भाजपाला पोटनिवडणुकीतही अनुकुलता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:47 IST

प्रस्थापित विरोधी लाट असतानाही मोदींची किमया थोड्याफार प्रमाणात गोव्यात चालली आणि पोटनिवडणुकीत भाजपाला समाधानकारक यश मिळाले.

- राजू नायक

पणजी : सत्ताधारी भाजपने जरी कमी संख्येने का होईना परंतु निवडणुकीची बाजी ३ -१ व १-१ अशी जिंकली असली तरी त्यांच्या संघटनात्मक कामाची ही सरशी आहे. या निकालाने काही प्रमाणात का होईना परंतु सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील प्रस्थापित विरोधी लाट त्यांना अडवून ठेवता आली. मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात घडलेली भाजपसाठीची ही पहिली निवडणूक. या शिवाय पक्षामधील अस्वस्थता, मुख्यमंत्री पदावर नवखा नेता व रा. स्व. संघातील बंडखोरी यांचा सामना पक्षाला करावा लागला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जो अनेक वर्षे भाजपची साथ करत होता, त्यानेही वैयक्तिक कारणांवरून काँग्रेसची साथ केली होती.

या पार्श्वभूमीवर शिरोडा, म्हापसा व मांद्रे या जागा कमी फरकाने का असेना भाजपने जिंकल्या आहेत. या पैकी शिरोडा व मांद्रे विधानसभा पोटनिवडणूक भाजपने दोन उमेदवार काँग्रेसमधून पळविल्यामुळे घ्यावी लागली, तर पणजी व म्हपासाची पोटनिवडणूक तेथील भाजपचे आमदार दिवंगत झाल्यामुळे घ्यावी लागली. पणजीत पर्रीकरांचे पूत्र उत्पल पर्रीकर यांना सुरवातीला आश्वासन देऊन नंतर उमेदवारी नाकारण्यात आली. तेथे घराणेशाहीला नाकारताना माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी असतानाही तिकीट देण्यात आले. पणजीमध्ये एक मोठा वर्ग जो ख्रिस्ती आहे, भाजपला अस्पृश्य मानत असतानाही पर्रीकरांना मतदान करत होता, त्याने यावेळी बाबूश मोन्सेरात यांची साथ करणे पसंद केले.

म्हापसा शहरात भाजपचे दिवंगत नेते फ्रान्सीस डिसोझा याचे पूत्र जोशुआ यांना उमेदवारी देण्याची जोखीम यशस्वी झाली.स्वाभाविकपणे भाजपला देशातील मोदी लाटेचा काही प्रमाणात फायदा झालेला आहे. दक्षिणेत मात्र अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाने भाजपची साथ करण्याचे नाकारले आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात जेथे हिंदू प्राबल्य आहे, तेथे मोदी लाट जाणवली. तेथे श्रीपाद नाईक चौथ्यांदा विजयी झाले.

 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा