शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरतेला पायबंद घालण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून नेत्यांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 19:21 IST

आमदारांनी पक्षातून फुटू नये म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आवाज उठवत असतानाच आता भाजपच्याही काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातील आमदारांना भाजपमध्ये घेऊ नका, असे  आपल्या नेत्यांना स्पष्टपणे बजावले आहे.

पणजी  - आमदारांनी पक्षातून फुटू नये म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आवाज उठवत असतानाच आता भाजपच्याही काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातील आमदारांना भाजपमध्ये घेऊ नका, असे  आपल्या नेत्यांना स्पष्टपणे बजावले आहे. सांतआंद्रेचे काँग्रेस कार्यकर्ते फ्रान्सिस सिल्वेरा यांना पक्षात घेतले जाणार नाही, अशी ग्वाही देण्यास सांतआंद्रेतील भाजप कार्यकर्त्यांनी  मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना भाग पाडले.काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये येऊ शकतात, अशा अर्थाची विधाने लोकसभा निवडणूक निकाल लागला त्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी केली होती. त्यानंतर सांतआंद्रे, कुंकळ्ळी व अन्य काही मतदारसंघांमधील काँग्रेस आमदार व भाजपच्या काही नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या असल्याची चर्चा पसरली. आमच्या आमदारांना भाजपकडून कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी थेट सांगत भाजपच्या काही नेत्यांना दबावाखाली आणले. आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी तर सांतआंद्रेतील काही लोकांना व भाजप कार्यकर्त्यांना आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असे सांगणेच सुरू केल्याची माहिती भाजपच्या सांतआंद्रेतील प्रमुख कार्यकर्त्यांना मिळाली. भाजपमध्ये हे सगळे चालले आहे तरी काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला. भाजपचे सांतआंद्रे मंडळाचे अध्यक्ष रविंद्र बोरकर तसेच 2017 साली भाजपच्या तिकीटावर लढलेले उमेदवार रामराव वाघ व इतरांनी मंगळवारी पणजीतील भाजप कार्यालय गाठले. तेंडुलकर तिथे उपस्थित होते. आम्हाला वस्तुस्थिती काय ते सांगा, तसेच सिल्वेरा यांना भाजपमध्ये घेऊ नका, कारण सांतआंद्रेत आम्ही खूप कष्ट घेऊन भाजपला बळकट केले आहे व त्यामुळे सिल्वेरा घाबरलेत, असे कार्यकर्त्यांनी तेंडुलकरांना सांगितले. आम्ही कुणालाच भाजपमध्ये घेणार नाही, तसा प्रस्तावच नाही. काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये येण्यास तयार असले तरी, आम्हाला विद्यमान सरकारमध्ये वाद निर्माण करायचा नाही, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले. सिल्वेरा यांना पक्षात प्रवेश देऊ नका अशी विनंती करणारे पत्रही कार्यकर्त्यांनी तेंडुलकर यांना दिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही या पत्राची प्रत पाठवली गेली. सिल्वेरा यांना पक्षात घेण्याचा प्रस्ताव नाही, असे तेंडुलकर यांनी मग पत्रकारांनाही सांगितले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा