शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

गोवा शैक्षणिक हब बनतंय, उच्च शिक्षणाला पोषक वातावरण - मनोहर पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:56 AM

गोवा राज्य शैक्षणिक हब बनत आहे. उच्च शिक्षणाला पोषक असे वातावरण या राज्यात असून वार्षिक दीड हजार ते एक हजार आठशे अभियांत्रिकी पदवीधर या राज्यात तयार होत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

पणजी - गोवा राज्य शैक्षणिक हब बनत आहे. उच्च शिक्षणाला पोषक असे वातावरण या राज्यात असून वार्षिक दीड हजार ते एक हजार आठशे अभियांत्रिकी पदवीधर या राज्यात तयार होत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे सांगितले.नोबेल प्राईज सिरिज इंडिया-2018 हा जागतिक इवेन्ट प्रथमच गोव्यात व दुसऱ्यांदा भारतात होत आहे. येत्या दि. 1 फेब्रुवारीला या सोहळ्यास आरंभ होईल. त्यानिमित्ताने पाच ते सहा नोबेल शास्त्र गोव्याला भेट देणार आहेत. कला अकादमीत नोबेलविषयक प्रदर्शन असेल. दि. 1 ते 28 फेब्रुवारीर्पयत हे प्रदर्शन खुले राहील. या इवेन्टविषयी माहिती देण्याच्या हेतूने आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बोलत होते. 

गोव्यात चार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या शिवाय सहा पॉलिटेक्नीक संस्था आहेत. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, बिट्स पिलानी आणि अन्य शैक्षणिक संस्था तसेच राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थाही (एनआयओ) गोव्यात आहे. गोव्यात विज्ञान शिक्षणाला पोषक वातावरण आहे. युवकांमध्ये विज्ञान शिक्षणविषयक प्रेम वाढावे व त्यांची विचार करण्याची क्षमता देखील विज्ञानाच्या आधारे विकसित व्हावी, त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त व्हावा या दृष्टीकोनातून नोबेल प्राईज सिरिज इंडिया-2018 हा सोहळा उपयुक्त ठरेल. प्रदर्शनाचा लाभ देशभरातील मंडळींना घेता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रलयाच्या अखत्यारित येणाऱ्या बायोटेक्नोलॉजी खात्याने व गोवा सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने मिळून नोबेल मिडिया स्वीडनच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित केला आहे. स्वीडनचे नोबेलविषयक प्रदर्शन कला अकादमीत साकारेल. भारतीय संशोधकांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीचे प्रदर्शनही मांडले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विज्ञान शिक्षणाचा प्रसार होण्याच्यादृष्टीने हा सोहळा उपयुक्त ठरेलच. शिवाय जगभरातील संशोधक, नोबेल विजेते यांची भाषणो व अनुभव ऐकण्याची संधी सर्वाना मिलेल. विज्ञानविषयक चर्चासत्रे, संवाद, गोलमेज परिषद होईल. विद्याथ्र्यासह गोव्यातील शिक्षक, स्कॉलर्स यांनाही ते मदतरुप ठरेल, असे पर्रीकर म्हणाले. 

1 रोजी दुपारी साडेतीन वाजता या सोहळ्य़ाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन हेही यावेळी उपस्थित असतील. तज्ज्ञ, संशोधक आदी तीनशे मान्यवर तसेच सुमारे सातशे विद्यार्थी यात भाग घेतील. यापूर्वी गुजरातमध्ये हा सोहळा झाला होता, आता गोव्यात होत आहे, असे केंद्र सरकारचे सचिव विजय राघवन यांनी सांगितले. या सोहळ्य़ानिमित्ताने विविध चर्चासत्रे, व्याख्याने वगैरे कला अकादमीसह राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, तसेच फोंड्यातील कला मंदीर, मडगावचे रविंद्र भवन आणि अन्य ठिकाणी होणार आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरeducationशैक्षणिक