शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गोवा : एटीएम स्कीमर चोरांच्या कोल्हापुरात आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 14:52 IST

गोव्यात एटीएम मनिशला स्कीमर बसवून विविध बँकांमधील ग्राहकांच्या खात्यांवरील आॅनलाईन सिस्टीम हॅक करून ग्राहकांचे पैसे लंपास करणा-या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पेडणे पोलिसांनी पदार्फाश केला.

पणजी : गोव्यात एटीएम मनिशला स्कीमर बसवून विविध बँकांमधील ग्राहकांच्या खात्यांवरील आॅनलाईन सिस्टीम हॅक करून ग्राहकांचे पैसे लंपास करणा-या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पेडणे पोलिसांनी पदार्फाश केला. पोलिसांनी सलग तीन दिवस संशयितांचा आंतरराज्य पाठलाग करत संशयित आरोपी पीरजोल एननॉईल (४०), सिपोस वासिले लॉर्डियन (३७) यांच्या मुसक्या कोल्हापुरात आवळल्या. बुधवारी पेडणे शहरात या संशयितांनी ग्राहकांच्या अडीच लाख रुपयांवर डल्ला मारला होता. दोघा रुमानियन हॅकर्सना शनिवारी पेडणे पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांच्या मदतीने रात्री अटक केली.

या दोघांकून रोख ७ लाख १८ हजार ५४०, कार, दोन लॅपटॉप, पाच मोबाइल, सात एटीएम कार्ड, अमेरिका, इंग्लंड, मोरोक्को, रुमानिया इतर देशांच्या चलनी नोटा, नाणी व पासपोर्ट, रोख पैसे काढलेली स्लिप्स असा सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पीरजोल व सिपोस यांचे चांगले प्रस्तापित संपर्क असून यापूर्वीही जुलैमध्ये या संशयितांना गोवा पोलिसांनी अशाच आॅनलाईन स्कीमर चोरी प्रकरणात अटक केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

‘संशयितांनी कळंगुटमधून एका खासगी एजन्सीकडून ‘रेंट अ कार’ घेतली होती. मात्र, त्या मालकाने त्याच्याकडून कोणतीच कागदपत्रे घेतली नव्हती. शिवाय हे दोघेही हडफडे येथील हॉटेममध्ये राहत होते तिथे सुद्धा त्यांच्याकडून सी फार्म भरून घेतला नव्हता. त्यामुळे संशयितांचा पाठलाग व तपास करण्यास उशिर झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक चोडणकर यांनी दिली.’ संशियतांनी विविध बँकांचा डेटा चोरण्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवून एटीएम कार्ड्सव्दारे ग्राहकांचे पैसे लंपास करायचे, असेही चोडणकर यांनी सांगितले. 

गोवा राज्यातील पेडणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २७ सप्टेंबर रोजी एटीएम मशीनला स्कीमर बसवून बँकेतील ग्राहकांच्या खात्यावरील रोकड आॅनलाईनव्दारे परस्पर लुटलाच्या पाच तक्रारी दाखल झाल्याने पेडणे पोलीस चक्रावून गेले होते. २८ सप्टेंबरला पेडणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर धातकर हे रात्रगस्तीवर असताना त्यांना खेणीर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये  एक विदेशी नागरिक काहीतरी करीत असल्याचे दिसले. बाहेर लाल रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये दुसरा विदेशी नागरिक बसलेला दिसला. त्यांचा संशय आल्याने धातकर गाडीतून उतरताना पोलिसांची चाहूल लागताच एटीएममधील विदेशी नागरिक धावत कारमध्ये बसून भरधाव वेगाने निघून गेले. त्यांचा पाठलाग केला असता, ते सापडले नाही. त्यांनी याविषयी गोवा पोलीस नियंत्रण कक्षातून ही माहिती पुणे, मुंबई एअरपोर्टवर कळविली. 

दोघे परदेशी नागरिक पुणे-मुंबईला न जाता गगनबावडामार्गे कोल्हापूरला आले. पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला व संशयितांचे मोबाईल क्रमांक मिळविले. त्यांचे लोकेशन तपासले असता, ते कोल्हापुरातील एका पंचतारांकित हॉटेलवर उतरल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज व फोटो पाठवून कोल्हापूर पोलिसांनी सावध केले. दरम्यान, कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उतरलेल्या दोघा परदेशी नागकिरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी