शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पर्सिवल नोरोन्हा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 7:50 PM

गोवामुक्तीपूर्व आणि नंतरच्या काळातील चालता-बोलता इतिहास असे ज्यांचे वर्णन अतिशय योग्य ठरेल, ते मळा- पणजी येथील पर्सिवल नोरोन्हा यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.

पणजी : गोवामुक्तीपूर्व आणि नंतरच्या काळातील चालता-बोलता इतिहास असे ज्यांचे वर्णन अतिशय योग्य ठरेल, ते मळा- पणजी येथील पर्सिवल नोरोन्हा यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. इतिहास, खगोलशास्त्र यासह अन्य अनेक विषयांत रस घेऊन संपन्न आयुष्य जगलेल्या नोरोन्हा यांचे निधन हे अनेकांना चटका लावून गेले. गोव्यातील खगोलशास्त्र प्रेमींचे मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली. मृत्यूसमयी त्यांचे वय 96 होते.पर्सिवल नोरोन्हा हे पोर्तुगीज काळात 1951 साली सरकारी सेवेत रुजू झाले होते. गोवा मुक्तीनंतर ते नागरी सेवा परीक्षेला सामोरे गेले. तिथे त्यांची निवड होऊन ते पर्यटन खात्यात क्लास वन अधिकारी म्हणून सेवा बजावून मग 1982 सालानंतर निवृत्त झाले. नोरोन्हा यांचे मळा येथील पोर्तुगीजकालीन घर हे अनेक अभ्यासकांसाठी हक्काचे स्थान होते. पोर्तुगीज काळातील इतिहास नोरोन्हा यांना तोंडपाठ होता. ते पोर्तुगीजप्रेमी असल्याचा ठपका ठेवून अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका-यांनी नोरोन्हा यांच्यावर टीका केली. मात्र नोरोन्हा यांनी आपले पोर्तुगीजप्रेम कधी लपवलेही नाही. पोर्तुगीज काळात गोवा कसा होता, पणजी शहर कसे होते हे नोरोन्हा यांच्याकडून ऐकणे म्हणजे मोठी मेजवानी असायची. गोव्याचा एकूणच इतिहास, हेरिटेज आणि खगोलशास्त्र यावर ते भरभरून बोलायचे. नोरोन्हा हे मूळचे लोटली येथील होते. तथापि, त्यांच्या वडिलांनी मळा येथे स्थलांतर केल्यानंतर ते मळा येथेच स्थायिक झाले होते. नोरोन्हा अलिकडे आजारीच होते. वेर्णा येथे लुम परेरा कुटुंबीयांकडे ते राहायचे. तिथेच त्यांचे निधन झाले. ते कायम अविवाहित राहिले. गोवा सरकारच्या सेवेत प्रारंभी त्यांनी अव्वल सचिव म्हणून काम केले. उद्योग खात्यातही एकेकाळी संचालक होते. मुख्य शिष्टाचार अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. 1985 साली गोव्यात डॉ. जयंत नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय खगोल रसायन परिषद भरवली होती, तेव्हा नोरोन्हा हे खूप सक्रिय होते. पॉप सिंगर रेमो फर्नांडिससह अनेकांनी सोशल मीडियावरून नोरोन्हा यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले.