शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विधानसभा अधिवेशनाचे कामकाज 17 जानेवारीला ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 12:04 IST

गोवा विधानसभा अधिवेशनास येत्या 29 जानेवारीला आरंभ होणार आहे. विधानसभा अधिवेशन फक्त तीनच दिवसांचे आहे. पण सत्ताधा-यांमधील तीन आमदार गंभीर आजारी असल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनास खूप महत्त्व आहे.

पणजी : गोवा विधानसभा अधिवेशनास येत्या 29 जानेवारीला आरंभ होणार आहे. विधानसभा अधिवेशन फक्त तीनच दिवसांचे आहे. पण सत्ताधा-यांमधील तीन आमदार गंभीर आजारी असल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनास खूप महत्त्व आहे. येत्या 17 जानेवारीला अधिवेशनातील कामकाजाची रुपरेषा ठरणार आहे.

गोवा विधानसभा जरी एकूण चाळीस सदस्यांची असली तरी, काँग्रेसच्या दोन आमदारांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेचे संख्याबळ 38 झाले आहे. आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर प्रथमच हे अधिवेशन होत आहे. नव्या वर्षातील पहिले अधिवेशन असल्याने 29 जानेवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांचे अभिभाषण होणार आहे. त्या दिवशी आणखी मोठेसे काही कामकाज होऊ शकणार नाही.

त्यामुळे विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी व चर्चा करण्यासाठी फक्त दोनच दिवस मिळतात. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाजपाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर हे दोघेही आजारी आहेत. ते इस्पितळातून परतल्यानंतर घराबाहेर पडलेले नाहीत. ते अधिवेशनास उपस्थित राहतील काय हे अजून स्पष्ट झालेले नाही.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे चार महिने सचिवालय तथा मंत्रालयात आले नव्हते. त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. ते करंजाळे येथील आपल्या खासगी निवासस्थानी असतात पण शक्य होईल तेवढे काम ते घराकडून करतात. 1 आणि 2 जानेवारी रोजी मात्र ते सचिवालयात आले होते. येत्या 17 जानेवारीला विधानसभा अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी विधिमंडळ कामकाज समितीची (बीएसी) बैठक होणार आहे. त्या बैठकीला मुख्यमंत्री पर्रीकर उपस्थित राहणार आहेत.

या शिवाय सभापती प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, मंत्री सुदिन ढवळीकर व मंत्री विजय सरदेसाई यांची त्या बैठकीला प्रमुख उपस्थिती असेल. अधिवेशनात पाच महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घ्यावे की काय याविषयी बैठकीत निर्णय होणार आहे. आमदारांनी सध्या अधिवेशनासाठी लेखी प्रश्न सादर करण्यास आरंभ केला आहे. 

दरम्यान, अधिवेशन केवळ तीनच दिवसांचे बोलवणे हे अन्यायकारक आहे, असे विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी नुकतेच पत्रकारांना सांगितले व अधिवेशनाचा कालावधी वाढविला जावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरcongressकाँग्रेसBJPभाजपा