शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election: शिवसेना आणि आपकडून आलेली ऑफर स्वीकारणार? उत्पल पर्रिकरांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 00:05 IST

Goa Assembly Election 2022: शिवसेना नेते संजय राऊत आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता उत्पल पर्रिकर यांनी आपण या ऑफरचा विचारही करू शकत नाही, असे सांगत या ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्या. 

पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपाने पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता उत्पल पर्रिकर यांनी आपण या ऑफरचा विचारही करू शकत नाही, असे सांगत या ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्या. 

उत्पल पर्रिकर म्हणाले की, मी माझ्या पक्षाने दिलेल्या ऑफर विचारात घेतल्या नाहीत. मग इतर पक्षांनी दिलेल्या ऑफरचा विचारही करू शकत नाही. मला लोकांना पर्याय द्यायचा आहे. मी माझ्यासाठी पर्याय मागत नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपा सोडणार का, अशी विचारणा केली असता उत्पल पर्रिकर यांनी भाजपा माझ्या रोज मनात असेल, असं सांगितलं. मी भाजपाला नाही भाजपाने मला सोडलंय, तुम्ही त्यांना विचारा असं ते म्हणाले, दरम्यान, उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली. तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेरीस त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  

टॅग्स :Utpal Parrikarउत्पल पर्रिकरBJPभाजपाGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२