शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

Goa Assembly Election Results 2022: गोव्यात अमित शहा पुन्हा सक्रीय; काँग्रेसनेही मगोपशी संपर्क करण्यास केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 07:55 IST

गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२: अमित शहा पूर्ण रणनीती राबवत आहेत. मगोपशी भाजप आणि काँग्रेस दोघेही संपर्क करीत आहेत.

शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होत असून, आताच गोव्यात भाजप आणि काँग्रेसने सरकार स्थापन्यासाठी जोडतोडीचे गणित मांडायला सुरुवात केली आहे. 

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि डी. के. शिवकुमार यांच्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सुनील केदार व कर्नाटक काँग्रेसचे नेते गुंडू राव यांनाही गोव्यात तैनात करण्यात आले आहे. सुनील केदार यांना पाठविण्यामागे नेतृत्वाला वाटते की, महाराष्ट्राचे नेते जोडतोडीत कुशल आहेत. छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे वळविण्याचे काम ते सहज पार पाडू शकतील. पक्षाच्या सूत्रांनी खुलासा केला की, निवडून आलेल्या आमदारांना गरज पडल्यास मुंबईत आणता यावे म्हणून महाराष्ट्राच्या इतर मंत्र्यांनाही निकालानंतर गोव्यात पाठविले जाऊ शकते.

दुसरीकडे भाजपचेही जोडतोडीचे प्रयत्न वेगात सुरू आहेत. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब गोव्यात जाण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. 

पाठिंब्याची आहे खूप खात्री...खऱ्या अर्थाने अमित शहा पूर्ण रणनीती राबवत आहेत. मगोपशी भाजप आणि काँग्रेस दोघेही संपर्क करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे मगोप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात निवडणुकीच्या आधीच युती आहे. तृणमूल काँग्रेस आणि आप काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसला खात्री आहे की, तृणमूल काँग्रेस, आप आणि मगोपचा पाठिंबा आपल्याला मिळू शकतो.

टॅग्स :Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Amit Shahअमित शाह