शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election 2022: आलेक्स रेजिनाल्डचा तृणमूल काँग्रेसला धक्का; पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 21:43 IST

आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेले तरी या पक्षात ते खुश नव्हते. तृणमूलची कार्यपद्धत त्यांच्या अंगवाणी पडली नाही.

मडगाव : काँग्रेसचा राजीनामा देऊन अलिकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी रविवारी संध्याकाळी तृणमूल देत सर्वांना धक्का दिला आहे. ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलेक्स रेजिनाल्ड लोरन्स यांनी रविवारी संध्याकाळी कुडतरी येथे आपल्या निवासस्थानी आपले कार्यकर्ते व समर्थकांची बैठक घेतली. त्या बैठकीत तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी पुन्हा काँग्रेस जावे अथवा अपक्ष निवडणूक लढवावी. तृणमूलच्या तिकिटावर लढू नये, असे ठरले. त्यानंतर रेजिनाल्ड यांनी तृणमूलच्या सदस्यपदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्षांना पाठवून दिला. मात्र राजीनामा पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. या राजकीय घडामोडीनंतर रेजिनाल्ड यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, याबाबत प्रतिक्रीया देताना कुडतरीचे सरपंच मिलाग्रीस रॉड्रिग्ज म्हणाले की, आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना पंचायत मंडळाला विश्वासात घेतले नव्हते. तसेच तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देतानाही विश्वासात घेतलेले नाही. सोशल मीडिया तसेच लोकांकडून समजते की, रेजिनाल्ड स्वगृही परतणार आहे. आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स काँग्रेसचा राजीनामा दिल्याने कुडतरी काँग्रेस गट मंडळाने जिल्हा सदस्य मोरेनो रिबेलो, त्यांच्या पत्नी, शालोम सार्दीन व जोझेफ वाझ यांची नावें उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली आहेत. त्या चौघापैकी एकाला उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र आता रेजिनाल्ड पुन्हा कॉंग्रेसमध्ये आल्यास व त्याना उमेदवारी दिल्यास मतदार नाराज होउ शकतात असे मिलाग्रीस रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेले तरी या पक्षात ते खुश नव्हते. तृणमूलची कार्यपद्धत त्यांच्या अंगवाणी पडली नाही. त्यामुळेच त्यानी तृणमूल सोडसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अलिकडेच भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तर गोव्यातील एका राजकारण्याने रेजिनाल्ड याना स्वगृही परतण्याचे तसेच काँग्रेसची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने रेजिनाल्ड माघारी फिरले असावेत. अशी चर्चा कुडतरी मतदारसंघात सुरू आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२