शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

गोव्यात चतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, जाणून घ्या नेमकं कसं असणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:53 PM

गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही.

पणजी - गणेश चतुर्थीसाठी गोवा सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तसा आदेश महसूल सचिव संजय कुमार यांनी काढला आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही. अन्यथा १४ दिवस घरात क्वारंटाइन राहावे लागेल. गोव्यातील अनेक लोक नोकरी, धंद्यानिमित्त परराज्यात आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीला ते आपल्या गावी येत असतात.

शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक लोक गोव्यात नोकरी, व्यवसायासाठी आहेत त्यांनाही गावी जाणे शक्य होणार नाही. अन्य राज्यांमध्ये सणासाठी जाणाऱ्यांनी गणेश उत्सव आटोपून गोव्यात परतताना एक तर कोविड निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा किंवा आल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल. सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फुटांपेक्षा अधिक उंचीची असू नये असे बजावले आहे. सार्वजनिक मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम, देखावे करण्यास मनाई आहे.

- कंटेनमेंट झोन किंवा कोविडमुळे सील केलेल्या भागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला मनाई आहे.- चतुर्थीसाठी बाजारांवर पालिका, पंचायती यांनी देखरेख ठेवावी. गर्दी टाळण्यासाठी बाजाराची वेळ वाढवावी.- चित्रशाळांमध्ये गर्दी करु नये. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी चित्रशाळेत येऊ नये. तसेच चित्रशाळांनी २0 ऑगस्टपासूनच मूर्ती वितरण सुरु करावे.- गणेश मूर्तीसाठी राज्याची हद्द ओलांडून त्याच दिवशी २४ तासात परत गोव्यात आल्यास अशा व्यक्तीला चाचणी रिपोर्ट  किंवा क्वारंटाइनची गरज नाही.- सार्वजनिक मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम, देखावे करण्यास मनाई आहे. शक्य तो मंडळांनी आॅनलाइन दर्शनाची सोय करावी. या मंडळांना गणेशोत्सवास परवानगीबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी निर्णय घ्यावा.- सार्वजनिक गणेशमूर्ती बसविण्यासाठी तसेच विसर्जनाला ६ पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही. लोकांनीही एकमेकांच्या घरी जाणे टाळावे.- सार्वजनिक गणपतीच्या आरतीसाठी १0 पेक्षा अधिक गणेशभक्तांनी एकत्र येऊ नये. शारीरीक दुरीचे पालन करावे तसेच तोंडावर मास्क वापरावा.- सायंकाळी ५ ते रात्री १0 या वेळेतच विसर्जन करावे. विसर्जनासाठी पंचायती, पालिकांनी तासातासाच्या नियोजनाने वेळापत्रक तयार करावे.- गणेशमूर्ती नेणाऱ्या वाहनात पाचपेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही.- भटजींनी शारिरीक दुरी तसेच मास्क परिधान वगैरे मार्गदर्शक तत्त्वें पाळावीत.

दहीहंडीस मनाई

येत्या मंगळवारी जन्माष्ठमी असून त्यानिमित्त बुधवारी होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. जन्माष्टमीनिमित्त धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांनाही मनाई आहे. लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाऊ नये असे बजावण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या