शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा पुन्हा किलर स्टेट बनतेय ? अपघात, हत्या आणि बुडून मरणेही सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 13:56 IST

हिरवागार निसर्ग, मनमोहक पर्यटन आणि शेकडो वर्षे चालत आलेला जातीय व धार्मिक सलोखा लाभलेले गोवा राज्य पुन्हा एकदा किलर स्टेट बनू लागले की काय असा प्रश्न अनेक जाणकारांना पडू लागला आहे.

पणजी : हिरवागार निसर्ग, मनमोहक पर्यटन आणि शेकडो वर्षे चालत आलेला जातीय व धार्मिक सलोखा लाभलेले गोवा राज्य पुन्हा एकदा किलर स्टेट बनू लागले की काय असा प्रश्न अनेक जाणकारांना पडू लागला आहे. वाहन अपघातांची मालिका गोव्यात सुरूच आहे आणि पर्यटनस्थळी बुडून मृत्यू येण्याचे प्रकारही थांबलेले नाहीत. हत्येच्या घटनाही सुरू आहेत.

गोवा राज्य हा शांत प्रदेश असल्याचे मानले जाते पण या राज्यात अनैसर्गिक पद्धतीने मरणार्‍यांचे प्रमाण खूप चिंताजनक बनू लागले आहे. गेल्या पंधरवड्यातील विविध गावांमध्ये एकूण चौघा विवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी दोन घटना फोंडा व सत्तरी तालुक्यातील आहेत. राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यात आत्महत्यांबाबत सरासरी प्रमाण जास्त आहे. दर 72 तासांत एक आत्महत्या होते.

गेल्या दोन दिवसांत गोव्यात वाहन अपघातात तिघांचे बळी गेले आहेत. शिवाय अन्य दोन अपघातांमध्ये दोघे गंभीर जखमी झाले. दर 48 तासांत वाहन अपघातात गोव्यात एकाचा मृत्यू होतो. काहीवेळा यात पर्यटकांचाही समावेश असतो. गेल्या दहा दिवसात अपघातांत पाचजणांना मृत्यू आला असून त्यात दोघा मजुरांचा समावेश आहे. जानेवारी 2017 ते मार्च 2017 या पहिल्या तीन महिन्यांत गोव्यात एकूण 80 व्यक्तींचा मृत्यू वाहन अपघातात झाला आहे.गोव्यातील समुद्रात आणि धबधब्यासारख्या पर्यटन स्थळी पर्यटकांना किंवा स्थानिकांना बुडून मृत्यू येऊ नये म्हणून सरकार उपाययोजना करू लागले आहे. मात्र बुडून मृत्यू होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. गेल्या शनिवारी हरवळे धबधब्यावर झालेल्या 26 वर्षीय इसमाच्या मृत्यूनंतर पर्यटन खातेही हतबल झाले आहे. हत्येच्या घटनाही अधूनमधून घडत आहेत. गेल्या 12 वर्षांत गोव्यात 245 पर्यटकांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. यात काही हत्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनAccidentअपघात