शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील ड्रायव्हिंग स्कूल लोकायुक्तांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 13:41 IST

ड्रायव्हिंग स्कूलचा कारभार चक्क किचनमधून चालत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकायुक्तांच्या कारवाईत उघड झाला. १९८९ च्या केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा हा भंग आहे. 

पणजी : ड्रायव्हिंग स्कूलचा कारभार चक्क किचनमधून चालत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकायुक्तांच्या कारवाईत उघड झाला. १९८९ च्या केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा हा भंग आहे. प्राप्त माहितीनुसार म्हापसा शहरात 27 मोटर ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत. यापैकी ७ ड्रायव्हिंग स्कूल्सचे परवाने या ना त्या कारणामुळे रद्द करण्यात आलेले आहेत. दोन ड्रायव्हिंग स्कूल्स बंद पडलेली आहेत. सुरक्षित ड्रायव्हिंगचा अभाव, योग्य ती उपकरणे न ठेवणे, ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी वर्ग न घेणे आदी कारणांवरुन परवाने रद्द केलेले आहेत. लोकायुक्तांनी ड्रायव्हिंग स्कूलमधील गैरकारभाराची स्वेच्छा दखल घेऊन कारवाई चालवली आहे. सासष्टी, तिसवाडी तालुक्यांमध्ये आरटीओ अधिका-यांनाही लोकायुक्तांसमोर हजर रहावे लागले आहे. 

दरम्यान, ड्रायव्हिंग स्कूलमधील वाढत्या गैरकारभाराची दखर घेऊन आरटीओनेही राज्यभरातील १३५ ड्रायव्हिंग स्कुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओने हे काम गुरगांव, हरियाणा येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या संस्थेकडे सोपविले आहे. रस्ता सुरक्षेच्या बाबतीत केंद्रीय मोटर वाहन कायदा तसेच संबंधित नियमांचे सर्व निकष या स्कुलांकडून पाळले जातात की नाही, वाहन चालवण्याचे योग्य प्रशिक्षण दिले जाते की नाही हे कडक निकष लावून तपासले जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स देणे हा केवळ नाममात्र सोपस्कार राहू नये याचीही दक्षता घेतली जाईल. 

जे ड्रायव्हिंग स्कूल या ऑडिटमध्ये नापास होतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रसंगी त्यांचे परवानेही रद्द केले जातील, असा इशारा वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिला. येत्या महिन्यात हे ऑडिट सुरू होणार आहे. काही ड्रायव्हिंग स्कूलचा दर्जा इतका खालावलेला आहे की त्यांचे असे ऑडिट होणे ही काळाची गरज होती. इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या संस्थेची स्थापना २00६ मध्ये मानेसर, हरियाणा येथे झाली. मानेसर येथे या संस्थेची दोन केंद्रे आहेत. ही स्वायत्त संस्था असून केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणा-या ‘नाटिस’चा विभाग आहे. ही संस्था पॉवरट्रेन, फोटोमेट्री, आवाजाचे कंपन आदी बाबतीत दर्जेदार सेवा देते असे सांगण्यात आले. 

टॅग्स :goaगोवाcarकारPoliceपोलिस