गोव्यात 15 दिवसांमध्ये  2 हजार 300 रुग्णांची कोरोनावर मात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 01:00 PM2020-07-31T13:00:45+5:302020-07-31T13:01:09+5:30

राज्यात कोविड चाचण्यांचे अहवाल उशिरा येतात ही खूप चिंतेची गोष्ट आहे. लोकांत त्याविषयी संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे.

In Goa, 2,300 patients overcome corona in 15 days | गोव्यात 15 दिवसांमध्ये  2 हजार 300 रुग्णांची कोरोनावर मात 

गोव्यात 15 दिवसांमध्ये  2 हजार 300 रुग्णांची कोरोनावर मात 

Next

पणजी - कोविड इस्पितळात किंवा कोविड निगा केंद्रात जे कोविडग्रस्त दाखल होत आहेत, त्यापैकी जे 2 हजार 300 कोविडग्रस्त गेल्या महिनाभरात बरे झाले, त्यापैकी किमान 95 टक्के व्यक्तींचा वयोगट हा पन्नासर्पयत आहे. काहीजणांचा साठर्पयतही आहे. एकंदरीत ज्यांचे वय जास्त झालेले नाही व ज्यांना अन्य कसला गंभीर किंवा मोठा आजार नाही ते कोविडवर लवकर व यशस्वीपणो मात करू शकतात हे स्पष्ट होत आहे.

राज्यात कोविड चाचण्यांचे अहवाल उशिरा येतात ही खूप चिंतेची गोष्ट आहे. लोकांत त्याविषयी संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे. कोविडग्रस्त आजारातून बरे होण्याचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांत झपाटय़ाने वाढले असे आरोग्य खात्याच्या बुलेटिनची आकडेवारी दाखवून देते. अगोदर साठ ते सत्तर एवढेच कोविडग्रस्त रोज आजारातून बरे झाल्याचे दाखविले जात होते. आता एखाद्याला सलग दहा दिवस जर कोविडची कोणतीही लक्षणो दिसत नसतील तर त्यास कोविडमुक्त झाल्याचे जाहीर केले जाते व घरी पाठवले जाते. त्यापैकी एक किंवा दोघेजण घरी गेल्यानंतर जेव्हा खासगी प्रयोगशाळेतून चाचणी करून घेतली गेली तेव्हा पुन्हा कोविड पॉङिाटीव ग्रस्त आढळले असे देखील निष्पन्न झाले आहे. मात्र या सगळ्य़ामध्येही समाधानाची गोष्ट म्हणजे पन्नास ते साठ वयाचे शेकडो कोविडग्रस्त आतार्पयत आजारातून बरे झाले आहेत. तिस ते पन्नास वयोगटातील कोविडग्रस्त आजारातून बरे झाल्याची अनेक उदाहरणो आहेत. पन्नाशीहून जास्त वयाचे काही कोविडग्रस्त अजून उपचार घेत आहेत. कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस हे 49 वर्षे वयाचे आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अनेक पोलिस, काही वकील, आरोग्य खात्याने वीस तरी कर्मचारी, काही डॉक्टर्स वगैरे कोविडग्रस्त झाले व त्यापैकी बहुतेकजण कोविडवर मात करण्यात यशस्वी झाले. या डॉक्टर, वकील, पोलिस किंवा अन्य सरकारी कर्मचा-यांचे कुटूंबियही कोविडच्या संकटावर उपचाराअंती मात करून बरे झाले.

गोव्यात आतापर्यंत कोविडने एकूण 44 व्यक्तींचे बळी घेतले. यापैकी बहुतेक रुग्ण हे वयाची साठी ओलांडलेले आहेत. वयाच्या पन्नाशीत पोहचलेले काही रुग्णही दगावले पण त्यांना अन्य प्रकारचे गंभीर आजारही होते. मुरगाव तालुक्यातील ज्या चौदा वर्षीय मुलीचा बळी गेला तिलाही गंभीर आजार होता. त्यामुळेच तिला अगोदर गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही वृद्ध महिलांचा कोविडने बळी घेतला. मोजकेच कोविडग्रस्त मात्र एरव्ही गंभीर आजार नसतानाही कोविडमुळे बळी गेले. ज्यांना अनेक वर्षे डायबेटीस किंवा रक्तदाबाचा त्रस आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी असे डॉक्टरांचे म्हणणो आहे. काही कॅन्सर रुग्ण, किडणी रुग्ण व हृदयविकाराचे रुग्ण कोविडच्या हल्ल्यात मरण पावले आहेत. को-मॉर्बिड स्थितीत असणा:या रुग्णांचा जीव कोविडमुळे जाणार नाही याची काळजी वैद्यकीय व्यवस्थेने घ्यायला हवी. मात्र गोव्यात त्याबाबत अपयश आल्याचे दिसून येते.
 
दरम्यान, सत्तरी तालुक्यातील केरी येथील एका रुग्णाचे शुक्रवारी कोविडमुळे निधन झाले. त्यांच्यावर अन्य एका आजारासाठी उपचार सुरू होते, शिवाय त्याला कोविडही झाला होता. शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी त्याची प्राणज्योत मालवली. सत्तरी तालुक्यातील व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी बहुतांश बळी हे मुरगाव तालुक्यातील कोविडग्रस्तांचे गेले आहेत. त्यानंतर सासष्टी तालुक्याचा क्रमांक लागतो. बार्देशमध्येही तिघांचा कोविडने बळी घेतला. तिसवाडीत दोघांचा बळी यापूर्वी गेला आहे. कोविडमुळे मरण पावलेल्या व्यक्तींची संख्या शुक्रवारी 44 झाली.

Web Title: In Goa, 2,300 patients overcome corona in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.