शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
3
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
4
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
5
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
6
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
7
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
8
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
9
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
10
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
11
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
12
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
13
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
14
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
15
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
16
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
17
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
18
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
19
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
20
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

गोव्यात 2 टक्के गोमंतकीयांना कोरोनाची बाधा, 407 बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 20:15 IST

गेल्या चोवीस तासांत 612 कोविडग्रस्त ठीक झाले असून, सक्रिय रुग्ण सध्या 4 हजार 917 आहेत.

पणजी : राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण 407 मृत्यू झाले आहेत. सोमवारी सहा जणांचा मृत्यू झाला. नवे 438 कोविडबाधित सोमवारीआढळले. राज्यातील एकूण 2 टक्के लोकांना आतापर्यंत कोविडची बाधा झाली व त्यापैकी 27 हजार 72 व्यक्ती आजारातून ठीक झाल्या. 16 लाख लोकसंख्येच्या गोव्यात एकूण 2 लाख 51 हजार 33 व्यक्तींची गोव्यात कोविड चाचणी केली गेली. एकूण 32 हजार 396 व्यक्तींना कोविडची लागण झाली. गेल्या चोवीस तासांत 612 कोविडग्रस्त ठीक झाले असून, सक्रिय रुग्ण सध्या 4 हजार 917 आहेत. आजारातून ठीक झालेल्या व्यक्तींचे प्रमाण सोमवारी 83.56 टक्के राहिले.साखळी रुग्णालय क्षेत्रात सध्या 365 तर वाळपई आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 209 कोविडग्रस्त आहेत. पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 405 कोविडबाधित आहेत. मडगावमध्ये संख्या 350 तर वास्कोत संख्या 295 आहे. धारबांदोडाला संख्या 114 आहे.50 वर्षीय दोघे रुग्ण दगावलेदरम्यान, बस्तोडा- म्हापसा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचे सोमवारी निधन झाले. तसेच हळदोणा येथीलही 50 वर्षीय रुग्णाचे कोविडने निधन झाले. खोर्ली म्हापसा येथील 64 वर्षीय तर वेर्ला काणका येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोविडने बळी घेतला. सासष्टीतील 68 वर्षीय रुग्ण आणि सांगेतील 59 वर्षीय रुग्णाचा कोविडने बळी घेतला आहे. सहापैकी तीन रुग्ण गोमेकॉ इस्पितळात तर ईएसआय इस्पितळात एकटा मरण पावला. सांगेच्या आरोग्य केंद्रात एकाचा जीव गेला तर दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एक रुग्ण मरण पावला. सांगेच्या आरोग्य केंद्रात रुग्णाला आणल्यानंतर 30 मिनिटांत त्याचा जीव गेला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या