शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प गुजरातच्या ‘सुमूल’कडे जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 13:11 IST

गोवा डेअरीचा उसगांव येथील पशूखाद्य प्रकल्प गुजरातची सुमूल डेअरी ताब्यात घेणार असे वृत्त समोर आले आहे. सुमूलने गोवा प्रवेश केल्याच्या दिवसापासून वाद सुरू झाला आहे. गोवा डेअरीचे चेअरमन माधव सहकारी यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पासाठी लागणारी सरकी पेंड, मका, सफेद पॉलिश राइस आदी सर्व कच्चा माल शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशमधून आणावा लागतो. गोव्यात तो उपलब्ध नाही.

पणजी : गोवा डेअरीचा उसगांव येथील पशुखाद्य प्रकल्प गुजरातमधील सुमूल डेअरी ताब्यात घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र गोवा डेअरीचे चेअरमन माधव सहकारी यांनी हे वृत्त फेटाळून लावताना सध्या हा कारखाना नफ्यात असल्याचा दावा केला आहे.सहकारी म्हणाले की, ‘उसगांव येथील पशूखाद्य प्रकल्प सुमूल घेणार ही निव्वळ अफवा आहे. आमच्यापर्यंत अशी कोणतीही माहिती अजूनपर्यंत आलेली नाही. या कारखान्याला गेल्या वर्षी 5 कोटी रुपये तोटा झाला होता याचे कारण उच्च प्रथिनयुक्त पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारी सरकी पेंड, मका, सफेद पॉलिश राइस आदी सर्व कच्चा माल शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशमधून आणावा लागतो त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. यंदा मात्र नफा होऊ लागला आहे.’

गोवा डेअरीशी १७९ दुध उत्पादक संस्था संलग्न असून त्याती ३६ सोसायट्यांना दूध साठविण्यासाठी बल्क मिल्क कूलर देण्यात आलेले आहेत. उर्वरित सोसायट्यांनाही ते दिले जातील. यामुळे आता तेथल्या तेथे दूध थंड करता येते. आधी दूध सोसायट्यांकडे दूध संकलन झाल्यानंतर प्रत्यक्षात ते डेअरीपर्यंत पोहोचण्यासाठी चार ते पाच तास लागायचे यामुळे दूध खराब होत असे. 

दोन मोठे टँकर्स खरेदी करणारसोसायट्यांमधून दूध वाहतुकीसाठी प्रत्येकी १२ हजार लिटर क्षमतेचे दोन मोठे टँकर्स खरेदी करण्याचे डेअरीने ठरविले आहे. कूलरची अद्ययावत सुविधा असलेल्या या टँकरची प्रत्येकी २२ लाख रुपये किंमत आहे. सध्या दोन टँकर्स भाडेपट्टीवर कार्यरत आहेत. केंद्राच्या नॅशनल प्रोग्रॅम फॉर डेअरी डेव्हलॉपमेंट योजनेंतर्ग गोवा डेअरीला १६ कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे. ७ कोटी ९१ लाख रुपयांचा पहिला हप्ताही डेअरीला प्राप्त झालेला आहे. त्या अंतर्गत सुधारणा हाती घेण्यात येत आहे. दिवशी 200 लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन असलेल्या शेतक-यांना मिल्क कूलर देण्यात येत आहेत.

सुरत डिस्ट्रिक्ट को आॅप मिल्क प्रोड्युसर्स युनियन (सुमूल)ने गोव्यात प्रवेश केल्यापासून वेगवेगळ्या वावड्या उठत आहेत. एकीकडे उसगांवचा पशुखाद्य प्रकल्प सुमूल ताब्यात घेणार अशी चर्चा असताना दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत या प्रकल्पाला सुमारे ८ लाख रुपये नफा झाल्याचा दावा दुध उत्पादक महासंघाने केला आहे. शेतक-यांना सध्या पशुखाद्य १६.८0 रुपये प्रती किलो या सवलतीच्या दरात दिले जाते.

टॅग्स :goaगोवाGujaratगुजरातfoodअन्नBJPभाजपा