शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘चालकांना हेल्मेट घालण्याची बुद्धी दे’; गोवा पोलिसांचे गणपतीला साकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:59 PM

गणपती बाप्पाला घालण्यात येणारे गा-हाणे हे आपले कुटुंब, किंवा संस्थेचे हीत साधणे यापलिकडे कधी असते असे सांगितले तर पटणे कठीणच, परंतु हणजुणे पोलीस स्थानकात पूजलेल्या सार्वजनिक गणपतीला सर्व पोलिसांनी लोकांच्या भल्यासाठी गा-हाणे घातले आहे.

पणजी: गणपती बाप्पाला घालण्यात येणारे गा-हाणे हे आपले कुटुंब, किंवा संस्थेचे हीत साधणे यापलिकडे कधी असते असे सांगितले तर पटणे कठीणच, परंतु हणजुणे पोलीस स्थानकात पूजलेल्या सार्वजनिक गणपतीला सर्व पोलिसांनी लोकांच्या भल्यासाठी गा-हाणे घातले आहे. हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणा-या चालकांना ते वापरण्याची बुद्धी द्यावी व त्यांचा सांभाळ करावा असे साकडे गणरायाला घातले आहेत. 

गणपतीच्या महापुजेनंतर विसर्जनापूर्वी गा-हाणे घालण्याची पद्धत आहे. घरातील गणपतीला कुटुंबाच्या रक्षणाचे तर सार्वजनिक गणपतीला त्या संस्थेतील सर्वांचे रक्षण करण्याचे वगैरे साकडे घातले जातात. हणजुणे पोलीस स्थानकातील सार्वजनिक गणेश मूर्तीच्या महापूजेनंतर घालण्यात आलेले गा-हाणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्तवपूर्ण संदेश देणारे होते. पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी ही माहिती दिली. 

कोंकणी भाषेतून घालण्यात आलेल्या या गा-हाण्याचे भाषांतर असे: ‘हे श्री गणराया, आम्ही सर्व पोलीस तुझ्याकडे आमच्या रक्षणाची जशी प्रार्थना करतो आहोत तशीच लोकांच्या रक्षणाचीही करीत आहोत. हेल्मेट शिवाय वाहने चालविणा-यांना हेल्मेट घालण्याची व सीटबेल्ट न वापरणार्यांना ते वापरण्याची बुद्धी द्यावी, ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर न करण्याचा, भरधाव गाडी चालविणा-यांना तसे न करण्याचा आणि रस्त्याच्या बाजूने चालणा-यांची काळजी घेऊन चालविण्याचा समजुतदारपणा सर्व चालकांना द्यावा. लहान मुलांकडे वाहने न देण्याची बुद्धी पालकांना द्यावी. रस्त्यावर घडणा-या अपघातांमुळे आम्ही नैराश्येत लोटण्याची भितीही वाटत आहे. त्यामुळे सर्वांचे रक्षण करावे देवा. मंगलमूर्ती मोरया’.

टॅग्स :goaगोवाGanpati Festivalगणेशोत्सव