म्हापशात तरुणीची आत्महत्या
By Admin | Updated: June 24, 2014 01:23 IST2014-06-24T01:18:33+5:302014-06-24T01:23:23+5:30
बार्देस : म्हापसा येथील नवतारा हॉटेलसमोरील खाणावळीत काम करणाऱ्या शबाना कासिम (वय १८, मूळ रा. कुमठा-कारवार) हिने दुपट्ट्याच्या साहाय्याने

म्हापशात तरुणीची आत्महत्या
बार्देस : म्हापसा येथील नवतारा हॉटेलसमोरील खाणावळीत काम करणाऱ्या शबाना कासिम (वय १८, मूळ रा. कुमठा-कारवार) हिने दुपट्ट्याच्या साहाय्याने खाणावळीच्या छप्पराच्या वाशाला गळफास लाऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ९ ते १०.३० च्या दरम्यान घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
याबाबत म्हापसा पोलिसांनी सांगितले की, शबाना कासिम दोन महिन्यांपूर्वी या खाणावळीत कामास आली होती. ती खाणावळ उघडण्यासाठी सकाळी नऊ वाजता आली. नंतर साडेदहाच्या दरम्यान खाणावळीची मालकीण आली. तिला दार बंद दिसले. तिने दार उघडले असता शबानाने गळफास लाऊन घेतल्याचे दिसले. त्यावर म्हापसा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक महेश गावकर, पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठू नाईक, सुशांत चोपडेकर आदींनी पाहणी केली. मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविला. पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव हन्सीकुट्टी तपास करीत आहेत. शबानाच्या नातेवाईकांनी पत्रकारांना सांगितले की, शबाना हिचे तिच्या गावातील एका तरुणावर प्रेम होते. त्यामुळे घरच्यांनी तिला सुधारण्यासाठी गोव्यात आणून कामास ठेवले होते.
(प्रतिनिधी)