विद्यार्थिनीवर केपेत तिघांकडून बलात्कार
By Admin | Updated: December 24, 2015 01:54 IST2015-12-24T01:53:57+5:302015-12-24T01:54:33+5:30
केपे : येथील एका विद्यालयात नववीतील १५ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात

विद्यार्थिनीवर केपेत तिघांकडून बलात्कार
केपे : येथील एका विद्यालयात नववीतील १५ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात केपे पोलिसांनी तीन संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे़
संशयितांपैकी एक संशयित बारावीचा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे़ यासंबंधी एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद केल्याची माहिती केपेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिली़
या विद्यार्थिनीला आई-वडील नाहीत. ती निकटवर्तियांच्या घरी राहात होती़ एप्रिल २०१५ ते जून २०१५ या तीन महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर तीन संशयितांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे़ यातून तिला दिवस गेल्याने हा प्रकार उघडकीस आला़
या संदर्भात केपे पोलीस अधिक तपास करत आहेत़ (प्रतिनिधी)