जीसीए त्रिकुटाची जामीनवर सुटका
By Admin | Updated: June 24, 2016 20:46 IST2016-06-24T20:46:07+5:302016-06-24T20:46:07+5:30
निधीच्या अफरातफर प्रकरणात अटक करण्यात तीन्ही गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) तिन्ही पदाधिकाऱ्यांना पणजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने

जीसीए त्रिकुटाची जामीनवर सुटका
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २४ - निधीच्या अफरातफर प्रकरणात अटक करण्यात तीन्ही गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) तिन्ही पदाधिकाऱ्यांना पणजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीनवर मुक्त केले.
जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांच्या जामीन अर्जावर निवाडा देताना तिघांनाही मुक्त केले. त्यांना 4 लाख रुपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि 4 दिवस पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागात हजेरी लावण्याच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. रविवार पासून सतत 4 दिवस सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 यावेळेत त्यांना पणजी येथील आर्थिक गुन्हे विभागात ऊपस्थित रहावे लागणार आहे.
तिघांविरुद्द नोंदविण्यात आलेले गुन्हे, लावण्यात आलेली कलमे , न्यायालयात झालेले ऊभय बजूंचे युक्तिवाद आणि संशयितांनी आतापर्यंत कोठडीत काढलेले दिवस या गोष्टी विचारात घेवून न्यायमूर्ती विजयलक्ष्मी शिवोलकर यांनी हा निवाडा दिला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेला 3.13 कोटी रुपये निधी अनाधिकृत खाते खोलून निधीची अफरातफर केल्याचा तिघांवरही ठपका असून त्याच कारणासाठी त्यांना अटक करण्यात आली होती.
15 दिवस जीसीएत मज्जाव
तिन्ही संशयितांना जामीन मंजूर करतानाच व्यायाम याने त्यांना 15 दिवस पर्यत न्यायालयाच्या परवानगीशिवाय जीसीएत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या काळात जीसीएच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. साक्षिदारांना धमकावण्यासारखे प्रकार न करण्याचीही समज देण्यात आली आहे.