पणजीत डी. डी. कोसंबी महोत्सव; आज गौर गोपाल दासांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 07:49 IST2025-02-24T07:49:27+5:302025-02-24T07:49:49+5:30

उद्घाटनानंतर 'रिलेशनशिप अॅण्ड लाईफ' या विषयावर वक्ते गौर गोपाल दास यांचे व्याख्यान होणार आहे.

gaur gopal das lecture today in d d kosambi festival panjim | पणजीत डी. डी. कोसंबी महोत्सव; आज गौर गोपाल दासांचे व्याख्यान

पणजीत डी. डी. कोसंबी महोत्सव; आज गौर गोपाल दासांचे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कला संस्कृती खात्यातर्फे आयोजित १४ वा डी. डी. कोसंबी महोत्सव आज, सोमवारपासून सुरू होत आहे. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात सायं. ४:३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित असणार आहे, तर सन्मानीय पाहुणे म्हणून कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे व प्रसिद्ध वक्ते गौर गोपाल दास यांची उपस्थिती असणार आहे.

उद्घाटनानंतर 'रिलेशनशिप अॅण्ड लाईफ' या विषयावर वक्ते गौर गोपाल दास यांचे व्याख्यान होणार आहे. मंगळवार, २५ रोजी सायं. ५ वा. प्रसिद्ध कादंबरीकार अलका सरावगी यांचे 'अॅण्ड ईट सेज, सेव्ह मी फ्रॉम सुसाईड' विषयावर या व्याख्यान होणार आहे. दि. २६ रोजी सायं. ५ वाजता उद्योजक, डिझायनर तथा छायाचित्रकार आदित्य गुप्ता यांचे 'सेव्हन लाईफ लेसन्स फ्रॉम एव्हरेस्ट' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दि. २७ रोजी सायं. ५ वा. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री निवेदिता भिडे यांचे 'रिलेवन्स मेसेज ऑफ द स्वामी विवेकानंद' या विषयावर तर दि. २८ रोजी सायं. ५ वा नौदल अधिकारी अभिलाष टॉमी यांचे 'सेलिंग अराऊंड द वर्ल्ड' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

 

Web Title: gaur gopal das lecture today in d d kosambi festival panjim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.