गॅसचा भडका उडून होरपळलेल्याचा मृत्यू
By Admin | Updated: December 10, 2015 01:55 IST2015-12-10T01:55:09+5:302015-12-10T01:55:19+5:30
मडगाव : गांधी मार्केट येथे मंगळवारी रात्री घरगुती गॅसचा भडका उडून आगीत होरपळेल्या भीमा गुंडप्पा याचे गोमेकॉत निधन

गॅसचा भडका उडून होरपळलेल्याचा मृत्यू
मडगाव : गांधी मार्केट येथे मंगळवारी रात्री घरगुती गॅसचा भडका उडून आगीत होरपळेल्या भीमा गुंडप्पा याचे गोमेकॉत निधन झाले. या दुर्घटनेत एकूण सात जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
घरातील गॅस सिलिंडरला वास येत असल्याने मॅकेनिकला बोलावले होते. गॅस दुरुस्त केल्यानंतर तो पेटवला असता अचानक भडका उडून पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली होती. यात सत्यवा जामुनी, भीमा गुंडप्पा, सुरेखा जामुनी, वृषभ जामुनी, बाबाजन जियाजी, शंकर भीमा व मेहबूब अली साब हे जखमी झाले होते. रात्री ९.५0 वाजता ही घटना घडली. या घटनेने या भागात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा गॅस सिलिंडर स्फोट असल्याची खबर चोहीकडे पसरली होती. मात्र, मागाहून गॅसचा भडका उडाल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले होते.
मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली होती. आग विझविण्यासाठी दोन बंबांचा वापर करण्यात आला होता. या दुर्घटनेत दहा हजारांची हानी झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आला.
(प्रतिनिधी)