शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील 12 जणांची गँग गोव्यात जेरबंद; 41 मोबाईल, ड्रग्सही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 17:39 IST

या टोळीला बागा कळंगूट परिसरातील एका हॉटेलमधून जेरबंद करण्यात आले असून ते गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून होते.

वासुदेव पागी - पणजी - सनबर्न पार्टीसाठी आलेली 12 गुन्हेगारांची टोळी कळंगूट पोलिसांकडून पकडण्यात आली. त्यांच्याकडून 41 महागडे मोबाईल आणि  एमडीएमए हा घातक अंमली पदार्थ सापडला. गँगचे मनसुबे नेमके काय होते याची माहिती घेण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत. ही अंतरराज्य टोळी महाराष्ट्रातील असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. 

या टोळीला बागा कळंगूट परिसरातील एका हॉटेलमधून जेरबंद करण्यात आले असून ते गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून होते. त्यांच्याकडे जप्त केलेल्या महागड्या मोबाईलवरून ते पट्टीचे मोबाईल चोरटे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी केला आहे. परंतु त्यांच्याकडे 8 ग्रँम एमडीएमए  अंमली पदार्थ सापडला आहे. एकूण मोबाईल 30 लाख रुपये किंमतीचे आहेत तर जप्त करण्यात आलेला ड्रग्स हा 24 हजार रुपये किंमतीचा आहे. एकूण 324000 रुपये किंमतीचा माल त्यांच्याकडे जप्त करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत पर्वरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेष कर्पेही उपस्थित होते.  

सनबर्नची तिकीटे घेतली होती -सनबर्न ईडीएम आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून गोव्यात आयोजित केलेल्या इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या लोकांचे मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी ही टोळी महाराष्ट्रातून गोव्यात आली होती इतक्याच तर्कावर तपास चालणार नाही. कारण ही टोळी प्रत्यक्ष सनबर्न पार्टीत प्रवेश मिळविणार होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाीन पद्धतीने पार्टीची तिकीटेही विकत घेतली होती अशी माहिती वालसान यांनी दिली. पार्टीत जाऊन कोणते गुन्हे करण्याचा त्यांचा इरादा होता हे तपासानंतरच सांगणे शक्य होईल असेही वालसान म्हणाले. पार्टीत शिरण्यापूर्वीच त्यांना पकडण्यात आल्यामुळे मोठाअनर्थ टळला आहे. 

एसयुव्हीने फिरणारे, पार्टीत प्रवेश मिळविणारेपकडली गेलेले 12 जणांचे गँग ही हलकेपणे घेण्यासारखा प्रकार नाही. कारण ते मोबाईल चोरटे असले तरी आयफोनसारखे महागडे मोबाईल चोरणारी ही गँग आहे. सनबर्न सारख्या महागड्या पार्टीची तिकीटे मिळविलेली ही गँग आहे. सर्वात महत्तवाचे म्हणजे हे चोरटे बसने किंवा साध्या वाहनाने आलेले नाहीत तर एसयुव्ही सारखी अलिशान कार घेऊन आले आहेत. त्यामुळे अत्यंत गंभीरपणे हे प्रकरण हाताळले जाणार असल्याचे अधीक्षक वालसान यांनी सांगितले. त्यांची एसयुव्ही गाडी पोलीसांनी जप्त केली आहे.  

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ