लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभेचे सभापती गणेश गावकर यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधानभेचे सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.
या बैठकीत दोन्ही राज्यांच्या विधानसभांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. विधिमंडळाच्या कामकाजात कार्यक्षमता वाढवणे, लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि सर्वोत्तम कार्यपद्धतीची एकमेकांशी देवाणघेवाण करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
प्रशासन अधिक परिणामकारक आणि पारदर्शक बनवण्यासाठी सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. या संवादातून दोन्ही राज्यांच्या लोकप्रतिनिधींमध्ये सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. सुशासन आणि विकासासाठी अशा बैठका महत्त्वाच्या ठरत असल्याचे नमूद करण्यात आले.
Web Summary : Ganesh Gaonkar met Maharashtra's CM and Assembly Speaker, focusing on strengthening legislative coordination. Discussions covered efficient governance, transparent administration, and sharing best practices between the states for improved public service.
Web Summary : गणेश गावकर ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री और विधानसभा अध्यक्ष से मुलाकात की, जिसमें विधायी समन्वय को मजबूत करने पर ध्यान केंद्रित किया गया। कुशल शासन, पारदर्शी प्रशासन और बेहतर सार्वजनिक सेवा के लिए राज्यों के बीच सर्वोत्तम प्रथाओं को साझा करने पर चर्चा हुई।