‘गडकरींमुळे गोव्याला २० हजार कोटींचे प्रकल्प’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 23:16 IST2017-05-27T23:16:27+5:302017-05-27T23:16:27+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पायाभूत साधन-सुविधांच्या विकासासाठी गोव्याला खूप मदत केली. आतापर्यंत गडकरी यांनी रस्ते, पूल व अन्य कामे
‘गडकरींमुळे गोव्याला २० हजार कोटींचे प्रकल्प’
- लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पायाभूत साधन-सुविधांच्या विकासासाठी गोव्याला खूप मदत केली. आतापर्यंत गडकरी यांनी रस्ते, पूल व अन्य कामे मिळून २० हजार कोटींचे प्रकल्प गोव्याला दिले. आठ हजार कोटींची कामे गोव्यात सुरू आहेत, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शनिवारी सांगितले.
सुदिन ढवळीकर यांनी नागपूरमध्ये जाऊन शनिवारी गडकरी यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ढवळीकर यांनी नागपूरहून ‘लोकमत’ला सांगितले, की सागरमाला व भारतमाला प्रकल्पांतर्गत हजारो कोटींची कामे गडकरींनी यापूर्वी मंजूर केली आहेत. ती यापुढील काळात मार्गी लागतील. गडकरी यांनी गोव्याच्या पायाभूत साधनसुविधा वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आगामी काळात अनेक प्रकल्प उभे राहिलेले पाहायला मिळतील. गडकरी यांनी जलदगतीने प्रकल्प मंजूर केल्याने अनेक रस्त्यांचे चौपदीकरण व सहापदरीकरण होताना दिसते. जुवारी नदीवरील पुलाचे कामही सुरू आहे.