‘लबाडाशी लबाडी’ आली कामाला
By Admin | Updated: February 8, 2015 01:32 IST2015-02-08T01:22:57+5:302015-02-08T01:32:39+5:30
पणजी : लबाडाशी लबाडी या कृष्णनीतीवर कोणाचा विश्वास असो किंवा नसो; परंतु पोलीस मात्र अनेक वेळा ही नीती

‘लबाडाशी लबाडी’ आली कामाला
पणजी : लबाडाशी लबाडी या कृष्णनीतीवर कोणाचा विश्वास असो किंवा नसो; परंतु पोलीस मात्र अनेक वेळा ही नीती वापरतात. वास्को दुहेरी खून प्रकरणातही हीच नीती वापरून पोलिसांनी संशयिताकडून गुन्हा कबूल करून घेतला. दंडुक्याला दाद देत नाही तेव्हा नियोजनबद्ध रणनीती वापरून तिच्याकडून सत्य
वदवून घेतले.
घटनास्थळी पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा दाराची मोडतोड किंवा दरवाजावर आघाताच्या कोणत्याही खूणा नसल्याचे पाहून त्याच क्षणी पोलिसांना तपासाची दिशा मिळाली होती. खुनी घराबाहेरील नव्हे, तर घरातीलच आहे हे संकेत त्यांना मिळाले होते.
शनिवारी पत्रकार परिषदेत पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी तसे सांगितलेही. संशयित प्रतिमा नाईकच्या अंगावरील मिर्चीपावडर आणि घरात पसरलेल्या मिर्चीपावडरवरूनही काही नाटक रचले गेल्याचे पोलिसांनी हेरले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला तो राज्यभरातील सर्व आवश्यक पोलीस अधिकाऱ्यांना वास्कोत बोलावून घेतले. त्यात गुन्हा अन्वेषण विभाग आणि जिल्हा पोलिसांचा समावेश आहे. कॉन्स्टेबलपासून अधीक्षकापर्यंतच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना कामे वाटून दिली. सर्वांनी ती व्यवस्थित पार पाडली आणि मोहीम फत्ते झाली. (पान २ वर)