डिचोलीत विविध घटनांत चार युवकांचा मृत्यू

By Admin | Updated: May 13, 2014 18:38 IST2014-05-13T18:37:24+5:302014-05-13T18:38:38+5:30

डिचोली : डिचोली तालुक्यात विविध घटनांत चार जणांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघा युवकांचा मृत्यू झाला, तर साळ येथे एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली.

Four youths die in various incidents of Dichol | डिचोलीत विविध घटनांत चार युवकांचा मृत्यू

डिचोलीत विविध घटनांत चार युवकांचा मृत्यू

डिचोली : डिचोली तालुक्यात विविध घटनांत चार जणांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघा युवकांचा मृत्यू झाला, तर साळ येथे एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. साखळी येथे एका इमारतीवरून पडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भायली पेठ-डिचोली येथे राहणारा मूळ पर्वरी येथील साईल संतोष रायकर (१५) या दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा साखळी येथील इमारतीवरून पडून रविवारी रात्री मृत्यू झाला. साईल आपल्या आईसमवेत एका लग्नाला गेला होता. लग्नानंतर ते साखळी येथे एका नातेवाईकाकडे गेले होते. सायंकाळी साईलच्या आईने त्याचा शोध घेतला असता, तो घरात आढळला नाही. मुलगा न आल्याने घरच्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानंतर रात्री १२.३० वाजेपर्यंत पोलिसांनी शोधाशोध केली असता, साईलचा मृतदेह साखळी येथील वाघेरी कॉम्प्लेक्सइमारतीच्या खाली आढळला. इमारतीच्या टेरेसवरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तपास चालू आहे. या घटनेमुळे रायकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साईल हा येथील शांतादुर्गा विद्यालयाचा विद्यार्थी असून यंदा दहावीत गेला होता व त्याने ९५ टक्के गुण प्राप्त केले होते. तो आपल्या आजोबांकडे भायली पेठ येथे राहात होता. पोलिसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपनिरीक्षक तुकाराम वाळके, राजाराम गावकर यांनी पंचनामा केला. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे डिचोलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात केरळी युवक ठार दुचाकीची धडक विजेच्या खांबाला बसल्याने डिंगणे-सुर्ल येथे सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास के. संतोष या २४ वर्षीय युवकाचा (मूळ केरळ व सध्या रा. डिंगणे) जागीच मृत्यू झाला. जीए ०४ डी ०९५९ क्रमांकाची दुचाकी घेऊन तो पाळीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तापासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अंकुश सावंत व राजाराम जावकर यांनी पंचनामा केला. अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू मोटरसायकलने पाळी येथे जाताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने विठ्ठल यलागुरूरप्पा कोलेकर हा मोर्ले-मालसपट्टा येथील इसम जागीच ठार झाला. जीए 0९ जे १५८२ क्रमांकाच्या मोटरसायकलने तो जात होता. धडक दिल्यानंतर वाहनचालकाने तेथून पोबारा केला. डिचोली पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीला पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात २७९, ३०४ या कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Four youths die in various incidents of Dichol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.