शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

फोंड्यात दोन ठिकाणी झालेल्या विविध अपघातात चार जण जखमी

By आप्पा बुवा | Updated: October 30, 2023 18:50 IST

अज्ञात कारने स्कुटरला ठोकर दिल्याने विशाल गावडे (वेलिंग) व जयेश गावडे (वेलिंग) हे दोघेजण जखमी झाले. 

फोंडा : फोंडा व धारबांदोडा परिसरात रविवारी रात्री उशिरा झालेल्या दोन अपघातात चार जण जखमी होण्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्तानुसार  बायथाखोल - बोरी येथे जीए -०५- क्यू- ३५६२ क्रमांकाची दुचाकी घेऊन  रविवारी रात्री ८ वाजण्याच्या वेलिंग येथील युवक जात होते. अज्ञात कारने स्कुटरला ठोकर दिल्याने विशाल गावडे (वेलिंग) व जयेश गावडे (वेलिंग) हे दोघेजण जखमी झाले. 

अपघातानंतर कार चालकाने कारसह अपघात स्थळावरून पळ काढला. मागून येणाऱ्या काही वाहन चालकांच्या लक्षात सदरचा अपघात येताच त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. जखमी झालेल्या दोघांना अगोदर फोंडा येथील सब जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर दोन्ही युवकांना अधिक उपाचारासाठी बांबोळी येथील गोमेकोत दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातास कादंब ठरलेल्या वाहनाचा व वाहन चालकाचा फोंडा पोलीस  शोध घेत आहेत. सहायक उपनिरीक्षक रोहिदास भोमकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. दयानंदनगर- धारबांदोडा येथे रविवारीच झालेल्या आणखीन एका अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.  दयानंदनगर- धारबांदोडा येथे रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास जीए-०८- झेड-९३६३ क्रमांकाचा मालवाहू ट्रक त्याच दिशेने जाणाऱ्या केए -३२-डी-०१६१ क्रमांकाच्या काँक्रीटवाहू ट्रकला ओव्हरटेक करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या केए -२९-सी-०६५७ क्रमांकाच्या माल वाहतूक ट्रकला धडक बसली. 

विचित्र पद्धतीने झालेल्या अपघातात तिन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात दोन्ही ट्रकचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत. फोंडा पोलीस स्थानकाचे सहायक उपनिरीक्षक सुधार गावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.

टॅग्स :Accidentअपघात