चार आमदारांचा पाठिंबा
By Admin | Updated: December 10, 2014 01:06 IST2014-12-10T01:02:50+5:302014-12-10T01:06:17+5:30
पणजी : उपोषणकर्त्या आंदोलकांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेस चार आमदारांनी तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी उपस्थिती लावून पाठिंबा जाहीर केला.

चार आमदारांचा पाठिंबा
पणजी : उपोषणकर्त्या आंदोलकांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेस चार आमदारांनी तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी उपस्थिती लावून पाठिंबा जाहीर केला. सत्ताधारी आमदार विष्णू वाघ यांनी या वेळी स्वत:च्याच सरकारवर तोंडसुख घेतले. या असंवेदनशील सरकारचा घटक म्हणवून घेण्यास आपल्याला लाज वाटते, असे ते उद्वेगाने म्हणाले. काँग्रेसचे समर्थन जाहीर करताना लुईझिन यांनी गोव्यातील तमाम जनतेने या आंदोलनास पााठिंबा द्यावा, असे आवाहन केले. राष्ट्रवादीनेही पाठिंबा जाहीर केला असून बुधवारपासून आंदोलन व्यापक केले जाईल. समितीतील सातजण बेमुदत उपोषणास बसतील, तसेच आंदोलनाच्या पुढील टप्प्यात गावागावांत कोपरा बैठका घेतल्या जातील.
काँग्रेसचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, पांडुरंग मडकईकर, अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी पाठिंबा देताना आपापल्या मतदारसंघातील लोकही तुमच्यासोबत राहतील, अशी ग्वाही आंदोलकांना दिली. वाघ स्वकीयांनाच उघडे पाडताना म्हणाले की, आंदोलक बंदर कप्तान खात्याच्या जेटीसमोर उपोषण करीत होते, तेव्हा मांडवी हॉटेलमध्ये भाजप आमदार, मंत्री जेवणावळी झोडत होते. आंदोलकांविषयी कळवळा होता म्हणून या जेवणावळींपासून आपण दूर राहिलो. काँग्रेस सत्तेवर असताना कोणी आंदोलन केले की, भाजप नेते येऊन पाठिंबा देत असत. आता सत्ता मिळाल्यावर ते बदलले. आपण येथे भाजपचा आमदार म्हणून नव्हे, तर माणुसकी जपणारा संवेदनशील लेखक म्हणून उपस्थित आहे. खरे तर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांकरवी नव्हे, तर स्वत: आंदोलकांसमोर येऊन आश्वासन द्यायला हवे होते; परंतु तसे झालेले दिसत नाही. आंदोलक उपोषणकर्त्यांच्या पाठीशी आपण अखेरपर्यंत राहीन, असे त्यांनी जाहीर केले. भाजपचे महामंत्री सतीश धोंड यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. (पान २ वर)