शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांच्या आणखी चार मोडतोड प्रकरणातून बॉय निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 18:07 IST

गोव्यातील दिडशेपेक्षा अधिक धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप असलेल्या फ्रासिस्क परेरा उर्फ बॉय याला आणखी चार प्रकरणांतून मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केले. 

मडगाव - गोव्यातील दिडशेपेक्षा अधिक धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप असलेल्या फ्र ांसिस्क परेरा उर्फ बॉय याला आणखी चार प्रकरणांतून मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केले. आता पर्यंत अशा ९ प्रकरणात बॉय निर्दोष मुक्त झालेला आहे.मडगावच्या मुख्य न्याय दंडाधिकारी कल्पना गावस यानी संशयिताला २०१४ साली तळ्यागुंडो - पारोडा येथील क्रॉस, २०१६ मध्ये झालेल्या गुडी-पारोडा येथील ब्रह्म्माची मूर्ती तसेच २०१७ झालेल्या राय येथील क्रॉस मोडतोड प्रकरणात निर्दोष मुक्त केले. तर गुरूवारी सकाळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नारायण आमोणकर यानी त्याला १४ जुलै २०१७ रोजी पॉवर हाऊस मडगाव येथे केलेल्या क्रॉस मोडतोड प्रकरणातून आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केले़ यापूर्वी हाच संशयित लोटली येथील दोन क्रॉस, पारोडा येथील एक क्रॉस, कालकोंडा येथील कृष्ण मंदिर व तळवडे कुंकळ्ळी येथील ७ मंदीरांच्या तोडफोड प्रकरणातून निर्दोश मुक्त झाला आहे़संशयितावर आरोप निश्चित करण्यासाठी एकही पुरावा पुढे आलेला नाही असे नमुद करीत न्यायमुर्ती गवस यानी पोलिसांनी ही प्रकरणे अधिक सक्षमतेने तपास करण्याची गरज होती़ आणि सबळ पुरावे न्यायालयासमोर आणण्याची गरज होती असे खुल्या न्यायालयात आदेश वाचून दाखवताना म्हटले. मूळ प्रकरणात जो गुन्हा नोंद केला होता तो अज्ञात इसमा विरोधात नोंद केला होता हेही यावेळी न्या़ गवस यानी नोंद केले. या चारही प्रकरणात संशयिताच्या वतीने अ‍ॅड. अंजू आमोणकर, अ‍ॅड. मंजिला देसाई व अ‍ॅड़. एरिक कुतिन्हो यानी बाजू मांडली.मे ते जुलै या तीन महिन्यात गोव्यात ओळीने रस्त्याबाजूच्या धार्मिक स्थळांची मोडतोड चालू होती़ त्यामुळे सामाजिक वातावरणही काहीशे प्रक्षुब्ध झाले होते. अशा परिस्थितीत गोव्यात रात्रीच्यावेळी पोलिस गस्तही कडक केली होती. पोलिसांच्या दाव्या प्रमाणे १५ जुलैच्या रात्री फ्र ांसिस्को अशाच एका कामगिरीवर गेलेला असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांच्या दाव्या प्रमाणे त्यानंतर झालेल्या तपासात संशयिताने अशा प्रकारची आपण दीडशेच्या आसपास कृत्ये केल्याची जबानी दिली होती. बंद मूर्तीत प्रेतात्मे वास करून राहतात त्यामुळे त्याना मुक्त केले पाहिजे या धारणेतून संशयित मागची तेरा वर्षे अशी कृत्ये करायचा असा पोलिसांचा दावा होता.सांगेतील मोडतोड प्रकरणाचीही फाईल बंद होणार२००४ साली याच संशयिताने सांगे येथील वालकिणी व वाळशे येथील रस्त्याच्या बाजूला असलेली एका घुमटीची तसेच सिध्दाच्या मूर्तीची मोडतोड केल्याचा आरोप होता. मात्र तेरा वर्षापुर्वी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांकडे कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने या प्रकरणातलीही फाईल पोलिस बंद करणार अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे़ सध्या याच संशयितावर केपे न्यायालयात दोन वेगवेगळ्या क्रॉस तोडफोड प्रकरणाची आरोपपत्रे दाखल झाली असून लवकरच ही प्रकरणेही सुनावणीस येणार आहेत. 

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हाCourtन्यायालय