बांबोळी ते वेर्णापर्यंत चार उड्डाण पूल

By Admin | Updated: January 10, 2015 01:24 IST2015-01-10T01:17:04+5:302015-01-10T01:24:33+5:30

सहा पदरी जुवारी पुलाचा मार्ग मोकळा

Four flight bridges to Bamboo to Verona | बांबोळी ते वेर्णापर्यंत चार उड्डाण पूल

बांबोळी ते वेर्णापर्यंत चार उड्डाण पूल

पणजी : जुवारी नदीवर सहा पदरी पूल बांधला जाणार आहे. त्यासाठीची जागा निश्चित करण्यात आली आहे. हा पूल बांधतानाच बांबोळी ते वेर्णापर्यंतच्या पट्ट्यात एकूण चार उड्डाण पूल बांधले जाणार आहेत. एकूण चौदाशे कोटी रुपये खर्चाचा हा सारा प्रकल्प आहे, अशी माहिती बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना दिली.
मंत्री ढवळीकर म्हणाले की, येत्या २२ व २३ रोजी दिल्लीत एक बैठक होत असून त्या वेळी आम्ही जुवारीबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणार आहोत. सहा पदरी जुवारी पुलासाठी जागा निश्चित झाली आहे. केंद्रीय मंत्रालय फक्त आमच्या अहवालासाठी थांबले आहे. एकदा सविस्तर अहवाल मंजूर झाल्यानंतर लगेच निविदा जारी केली जाईल. बांबोळी ते वेर्णापर्यंतच्या उड्डाण पुलांमुळे वाहतूक कोंडीची सारी समस्या सुटेल. नुवे जंक्शन ते बेतूल-धर्मापूर असा रस्ता बांधला जाईल. काणकोणचे गालजीबाग व तळपण हे पूलही यापुढे बांधले जाणार आहेत. खांडेपार पुलासाठी निविदा जारी झाली असून येत्या महिन्यात कामाचा आदेश दिला जाईल.
मंत्री ढवळीकर म्हणाले की, गोव्याला प्रथमच ‘पंतप्रधान सडक सुरक्षा’ योजनाही लागू झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक रस्ते सुधारतील. राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी गोव्याला ११० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच लहानसहान जोडरस्त्यांच्या कामांसाठी ९९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. चौपदरी ढवळी बायपास मार्गही फोंडा व परिसरातील वाहतुकीत फार मोठा बदल घडवून आणेल. तिथेही उड्डाण पूल बांधले जाणार आहेत. दाबोळी विमानतळ ते सडा या मार्गाचेही काम होणार आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Four flight bridges to Bamboo to Verona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.